Property Rights : भारतात हिंदू उत्तराधिकारी कायद्याने मुलांना आणि मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिलेले आहेत. मुलाला आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीत जेवढा अधिकार असतो तेवढाच अधिकार मुलीला देखील मिळत असतो. म्हणजे मुलगी विवाहित असली घटस्फोटीत असली किंवा विधवा असली तरी देखील तिला भावाप्रमाणेच वडिलांच्या संपत्तीत समान अधिकार मिळतो.
मुलाचा जन्म झाला की तो त्याच्या आईवडिलांच्या संपत्तीचा वारसदार बनत असतो. मात्र असे असले तरी अनेक जणांना मूलबाळ होत नाही अशावेळी ते दत्तक मुल घेतात.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून दत्तक मुलाला संपत्तीत किती अधिकार मिळतो? त्या मुलाला त्याच्या जन्मदात्या कुटुंबाकडूनही संपत्ती मिळू शकते का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज आपण याच प्रश्नाविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दत्तक मुलाला संपत्तीत किती अधिकार मिळतो?
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तक मुलांचे हक्क हे कुटुंबातील मुलांप्रमाणेच असतात. हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार, कुटुंबातील मुलांप्रमाणेच दत्तक घेतलेल्या मुलाला देखील संपत्तीत अधिकार मिळत असतो.
हिंदू उत्तर अधिकारी कायदा हा हिंदु, बौद्ध, शीख आणि जैन धर्माच्या लोकांना लागू होतो. यात मुलगा आणि मुलीला दोघांनाही संपत्ती समान अधिकार देण्यात आले आहेत.
फक्त जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीलाच समान अधिकार मिळतात असे नाही तर एखाद्याने जर मूल दत्तक घेतले असेल तर त्याला देखील समान अधिकार दिले जातात. मुल दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच त्याला सर्व हक्क मिळतात आणि सदर दत्तक मूल मालमतेचा कायदेशीर वारस बनत असतो.
ज्याप्रमाणे एखाद्या मुलाचा जन्म झाल्यानंतर लगेचच तो त्याच्या पालकांच्या संपत्तीच्या वारसदार बनत असतो त्याचप्रमाणे मुलगा दत्तक घेतल्यानंतर, दत्तक घेण्याची कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर तोही लगेचच त्याच्या पालकांच्या संपत्तीचा वारसदार बनतो.
आई-वडिलांनी कमावलेली मालमत्ता म्हणजेच स्वअर्जित किंवा वडीलोपार्जित मालमत्ता या दोघांमध्ये पोटी जन्म घेतलेल्या मुलांप्रमाणेच दत्तक मुलाला देखील समान अधिकार दिले जातात.
दरम्यान, अनेकांच्या माध्यमातून दत्तक मुलाच्या जन्मदात्या कुटुंबाच्या संपत्तीतही त्याला अधिकार मिळू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की अशा दत्तक मुलाला त्याच्या मूळ परिवाराच्या संपत्तीत तेव्हाच अधिकार मिळू शकतो जेव्हा त्याच्या मुळ कुटुंबाने, जन्मदात्या कुटूंबाने इच्छापत्र तयार केलेले असेल आणि त्यामध्ये त्याचे नाव असेल.