Property Rights : संपत्तीचे दोन प्रकार असतात. वडिलोपार्जित संपत्ती आणि स्वअर्जित संपत्ती. यापैकी वडीलोपार्जित संपत्तीत हिंदू परिवारातील प्रत्येक सदस्याचा समान हक्क असतो. यामध्ये कुटुंबातील मुलांना आणि मुलींना समान हक्क मिळतो. पण स्वकष्टार्जीत संपत्ती ही स्वतः कमावलेली असते.
अशा परिस्थितीत अशा संपत्तीवर परिवारातील कोणत्याच सदस्याचा हक्क नसतो. अशी संपत्ती ज्या व्यक्तीने स्वतः कमावलेली असते तो व्यक्ती ती कोणालाही देऊ शकते. संपत्तीचा हा नियम आपल्याला सर्वांनाच माहिती आहे.
मात्र अनेकांच्या माध्यमातून आजोबा, वडील, भाऊ वडीलोपार्जित संपत्तीत हिस्सा देत नाहीत अशी तक्रार केली जाते. तसेच अशा प्रकरणांमध्ये काय केले पाहिजे असा देखील सवाल असतो.
त्यामुळे आज आपण जर वडीलोपार्जित संपत्तीत परिवारातील सदस्य हिस्सा देण्यास नकार दाखवत असतील तर काय कायदेशीर प्रक्रिया केली जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
वडिलोपार्जित मालमत्तेत किंवा संपत्तीत हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार परिवारातील प्रत्येक सदस्याला समान हक्क देण्यात आले आहेत. म्हणजे वडिलोपार्जित संपत्तीत वाटा घेण्याचा अधिकार प्रत्येकाला जन्माने प्राप्त होतो.
वडिलोपार्जित मालमत्तेची जर वाटणी झाली किंवा ती संपत्ती विकली गेली तर त्यात कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा असतो, यात मुलींनाही समान हक्क मिळतात.
पण जर वडिलोपार्जित संपत्तीत तुम्हाला वाटा मिळाला नाही तर तुम्ही वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळवण्यासाठी परिवारातील सदस्यांना कायदेशीर नोटीस पाठवू शकता.
आजोबा, वडील किंवा भाऊ जर तुम्हाला वडीलोपार्जित संपत्तीत तुमचा हिस्सा नसतील तर तुम्ही मालमत्तेवर तुमचा दावा सांगून दिवाणी न्यायालयात केस दाखल करू शकता.
केस प्रलंबित असताना मालमत्तेची विक्री होणार नाही याची खात्री करण्यासाठी, तुम्ही कोर्टाला सदर मालमत्तेवर स्टे बसवण्यास सांगू शकता.
जर मालमत्ता तुमच्या संमतीशिवाय विकली गेली असेल, तर तुम्हाला त्या खरेदीदाराला केसमध्ये पक्षकार म्हणून जोडून तुमच्या हिस्साचा दावा करावा लागणार आहे.