Property Rights : आपल्या देशात संपत्तीवरुन नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. वेळोवेळी न्यायालयाच्या माध्यमातून देखील संपत्ती बाबत मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जातात.
तथापि अनेकदा संपत्तीचे वादविवाद कोर्टात जातात आणि कोर्ट अशा प्रकरणांवर सुनावणी घेऊन योग्य तो निकाल देत असते.
दरम्यान अनेकांच्या माध्यमातून विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला पण हिस्सा मिळतो का हा सवाल उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण याच प्रश्नाचे उत्तर थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाचा अधिकार आहे की नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून मिळालेल्या संपत्तीत सदर महिलेच्या भावाला कोणताच अधिकार नसतो. यामुळे विवाहित बहिणीच्या संपत्तीवर भाऊ कोणत्याचं परिस्थितीत दावा करू शकत नाही.
भाऊ हा विवाहित बहिणीच्या परिवारातील सदस्य नसतो आणि तो विवाहित बहिणीच्या संपत्तीसाठी वारिसही नसतो अशा परिस्थितीत विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला कोणताचं हिस्सा मिळू शकत नाही.
म्हणून विवाहित बहिणीच्या संपत्तीत भावाला दावा सांगता येत नाही. हिंदू उत्तराधिकारी कायद्यामध्ये देखील याबाबत एक महत्त्वाची तरतूद करून देण्यात आली आहे. या कायद्यातील कलम (१५) मध्ये याबाबत एक तरतूद आहे.
या तरतुदीनुसार, हिंदू कुटुंबातील एखाद्या महिलेला तिच्या पतीकडून किंवा सासऱ्याकडून किंवा सासरच्या लोकांकडून मिळालेली संपत्ती ही केवळ पती किंवा सासरच्या वारसांना हस्तांतरित केली जाऊ शकते.
म्हणजेच अशी संपत्ती विवाहित महिलेच्या भावाला मिळू शकत नाही. विवाहित महिलेचा भाऊ हा तिच्या परिवारातील सदस्य नसतो आणि वारसही नसतो.
न्यायालयाने देखील याच तरतुदीनुसार विवाहित बहिणीच्या संपत्तीत, अशी संपत्ती जी विवाहित बहिणीला तिच्या पतीकडून किंवा सासरच्या मंडळी कडून मिळालेली असते अशा संपत्तीवर तिच्या भावाचा अधिकार राहत नाही असाच निकाल दिला आहे.