Property Rights : भारतात संपत्ती वरून नेहमीच वादविवाद पाहायला मिळतात. संपत्तीवरून कुटुंबांमध्ये भांडणे होत असतात. खरे तर संपत्तीच्या मालकाच्या मृत्यूनंतर ती संपत्ती नॉमिनीला किंवा संपतीच्या कायदेशीर वारसांना हस्तांतरित करावी लागते. मात्र ही संपत्ती हस्तांतरणाची प्रक्रिया खूपच गुंतागुंतीची असते.
समजा एखाद्या व्यक्तीने मृत्युपत्र किंवा इच्छापत्र तयार केलेले असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर सदर इच्छापत्रात नमूद असलेल्या लोकांना सदर मयत व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप केले जाते. मात्र, ज्या प्रकरणात इच्छापत्र तयार न करता व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्या संपत्तीचे वाटप कसे होते हा मोठा सवाल अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान, आज आपण इच्छा पत्र न बनवता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मालमत्तेची वाटणी कशी होते? या संदर्भात कायद्यात काय नियम आहेत? याविषयी अगदी सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
इच्छापत्र नसल्यास मयत व्यक्तीच्या मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते?
जर एखाद्या प्रकरणांमध्ये इच्छापत्र न बनवता एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते ? या संदर्भात जाणकार लोकांनी महत्वाची माहिती दिली आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मृत्युपत्र न लिहिताच निधन होते.
तेव्हा त्या व्यक्तीची मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये समान प्रमाणात वाटली जाते. मयत व्यक्तीची मालमत्ता ही उत्तराधिकारी कायद्यानुसार सर्वप्रथम वर्ग 1 च्या वारसांना समान वाटली जाते. वर्ग 1 च्या वारसांना म्हणजेच प्रथम श्रेणीत येणाऱ्या वारसदारांना या मालमत्तेची वाटणी केली जात असते.
आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे वर्ग 1 चे वारसदार म्हणजे कोण? तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की या वर्ग 1 वारसदारात, या प्रथम श्रेणीत पती/पत्नी आणि मुले वारस असतात. एवढेच नाही तर हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ नुसर इच्छापत्र नसल्यास मृत हिंदू व्यक्तीची आई देखील प्रथम श्रेणी वारस बनत असते.
म्हणजे मयत व्यक्तीच्या आईला देखील प्रथम श्रेणीचे वारस मानले जाते. तज्ञ लोक सांगतात की मयत व्यक्तीची मालमत्ता इच्छापत्र बनवलेले नसेल तर सर्व प्रथम पुत्र, मुली आणि पती यांना हस्तांतरित होते. दुसरे पतीच्या वारसांना, तिसरे आई किंवा वडिलांना, चौथे वडिलांच्या वारसांना आणि पाचवे आईच्या वारसांना मिळते.