Property Rights : आपल्या देशात संपत्ती वरून नेहमीच वाद-विवाद पाहायला मिळतात. भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून अनेकदा वाद-विवाद होतात. विशेषता जेव्हा आई-वडील हयात नसतात तेव्हा भावंडांमध्ये संपत्तीच्या कारणांवरून वाद होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून संपत्ती विषयक अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जातात.
असाच एक प्रश्न म्हणजे आई-वडिलांनी मुलगा दत्तक घेतल्यास त्या कुटुंबातील मुलींचा हक्क संपतो का ? अशा परिस्थितीत आज आपण या प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर मुलाला आणि मुलीला संपत्तीत समान अधिकार दिले गेले आहेत.पण जर एखाद्या कुटुंबात दत्तक मुलगा असेल तर अशा कुटुंबातील मुलींच्या अधिकाराबाबत अनेकांना माहिती नसल्याचे वास्तव आहे.
दरम्यान आज आपण अशाच मुलींच्या अधिकारा संदर्भात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एखाद्या हिंदू कुटुंबात जर दत्तक मुलगा असेल तर त्या कुटुंबात असणाऱ्या मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत किती हिस्सा मिळतो हे आता आपण समजून घेणार आहोत.
कायदा काय सांगतो बर
जर समजा एखाद्या दांपत्याला मुलगा नसेल फक्त मुली असतील आणि अशा प्रकरणांमध्ये जर सदर दांपत्याने मुलगा दत्तक घेतला तर त्या कुटुंबातील मुलींचा संपत्तीवरील हक्क हा संपत नाही.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या कुटुंबामध्ये फक्त मुलीच जन्माला आल्या असतील व त्या पती-पत्नीने मुलगा दत्तक घेतलला असेल तरी पूर्वी असलेल्या मुलीच्या हक्काला कोणतीही बाधा येणार नाही. पण, दत्तक घेतलेल्या मुलाला मिळकतीमध्ये समान हिस्सा दिला जाणार आहे.
म्हणजेच सदर दत्तक पुत्रामुळे मिळकतीमध्ये एक हिस्सेदार वाढणार आहे. कायद्याप्रमाणे सर्वांना समान हिश्श्याप्रमाणे हक्क मिळेल. जर वडिलोपार्जित मिळकत असेल तर पती-पत्नी, दत्तक मुलगा व त्या कुटूंबातील मुली असे हिस्से होणार आहेत.
वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना किती हिस्सा मिळतो
भारतीय कायद्याने वडीलोपार्जित संपत्तीत मुलींना मुलांप्रमाणेच समान अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे मुलांना वडीलोपार्जित संपत्तीत जेवढा हिस्सा मिळतो तेवढाच हिस्सा मुलींना देखील दिला जाणार आहे.
मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो तिला तिच्या वडिलांच्या वडीलोपार्जित संपत्तीत अधिकार असतो. एवढेच नाही तर मुलीचा घटस्फोट झाला असेल किंवा मुलगी विधवा असेल तरी देखील तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीत तिच्या भावांप्रमाणेच अधिकार दिला जातो.
म्हणजेच, मुलगी विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा असली तरी देखील तिचा तिच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत असणारा अधिकार हा अबाधित असतो.