Property Rights Son In Law : अनेकदा संपत्तीच्या अधिकारावरून परिवारामध्ये कलह होताना आपण पाहिले असतील. भावंडांमध्ये संपत्तीच्या वाटणीवरून नेहमीच वादविवाद होतात. अनेकदा हे वाद विवाद न्यायालयापर्यंत जातात. मग न्यायालयाच्या माध्यमातूनच संपत्तीच्या वाद विवादावर तोडगा काढला जातो.

मात्र न्यायालयात गेल्यानंतर हे प्रकरण लवकर निकाली निघत नाही. यामुळे सर्वसामान्यांना संपत्तीच्या नियमांबाबत थोडीफार माहिती असणे गरजेचे आहे. दरम्यान आज आपण संपत्तीच्या आणि मालमत्त्याच्या संदर्भात केरळ उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालाची माहिती पाहणार आहोत.

Advertisement

खरे तर अनेकांचा जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा मालमत्तेवर किती अधिकार असतो हा प्रश्न उपस्थित केला जात होता. याच प्रश्नाचे उत्तर केरळ उच्च न्यायालयाने आपल्या एका सुनावणीतून दिले आहे.

जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर किंवा मालवत्तेवर खरच अधिकार असतो का ? आणि हो, तर जावयाला सासऱ्याच्या संपत्तीत किती अधिकार मिळू शकतो याबाबत उच्च न्यायालयाने स्पष्टीकरण दिले आहे. चला तर मग वेळ न दवडता केरळ उच्च न्यायालयाने याबाबत काय निकाल दिला आहे याविषयी जाणून घेऊया.

Advertisement

काय होत प्रकरण

केरळ येथील हेंड्री थॉमस या इसमाने आपल्या जावया विरोधात म्हणजे डेव्हिसं राफेल विरोधात त्याच्या मालमत्तेवर अतिक्रमण करण्यापासून किंवा मालमत्ता आणि घराच्या शांततापूर्ण व्यवसाय आणि उपभोगात हस्तक्षेप करण्यापासून कायमस्वरूपी मनाई करण्याबाबत ट्रायल कोर्टासमोर दावा दाखल केला होता.

Advertisement

सेंट पॉल चर्च, थ्रीचंबरम यांच्या वतीने फादर जेम्स नाझरेथ यांनी दिलेल्या भेटवस्तूच्या आधारे ही मालमत्ता हेन्ड्रिला मिळाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या जागेवर स्वतःच्या पैशाने घर बांधले आहे आणि त्यात ते आता आपल्या परिवारासह येथे राहत आहेत. यामुळे हेन्ड्रिने आपल्या जावयाचा त्यांच्या मालमत्तेवर अधिकार नसल्याचा युक्तिवाद केला.

जावयाने यावर बोलतांना म्हटले की, सदर मालमत्ता ही चर्चच्या अधिकार्यांकडून कुटुंबाला भेट देण्यात आली होती. आता त्याने हेन्ड्रिच्या मुलीशी विवाह केला आणि विवाह केल्यावर तो व्यावहारिकदृष्ट्या कौटुंबिक सदस्य म्हणून स्वीकारला गेला आहे. यामुळे त्याला घरात राहण्याचा अधिकार आहे.

Advertisement

मात्र जावयाचा हा युक्तिवाद कोर्टाने अमान्य केला. लोअर कोर्टाने या प्रकरणावर निकाल देत जावयाला सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मग हे प्रकरण केरळ उच्च न्यायालयात पोहोचले. केरळ उच्च न्यायालयात जावयाने याचिका दाखल केली.

जावाई डेव्हिस राफेल याने आपले सासरे हेन्ड्री थॉमस यांच्या मालमत्तेवरील दावा फेटाळण्याच्या पाय्यान्नूर उपन्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती. केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांनी यावर सुनावणी घेतली होती.

Advertisement

सुनावनीत न्यायमूर्ती कुमार यांनी जावई आपल्या सासरच्या मालमत्ता आणि इमारतीवर कोणताही कायदेशीर हक्क सांगू शकत नाही असा निकाल दिला आणि सदर याचिका फेटाळून लावली. याचाच अर्थ जावयाचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर अथवा मालमत्तेवर कोणताही एक अधिकार नसतो. जावाई हा सासऱ्याच्या कुटुंबाचा भाग होत नाही.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *