Property Rights : संपत्तीच्या कारणावरून कुटुंबांमध्ये अनेकदा वादविवाद होत असतात. अशी प्रकरणे मग न्यायालयात जातात आणि न्यायालयाच्या माध्यमातूनच अशा प्रकरणावर निकाल दिला जातो. दरम्यान माननीय सुप्रीम कोर्टाने अर्थातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच संपत्तीबाबत एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
यामध्ये माननीय न्यायालयाने मुलींच्या वडिलांच्या संपत्तीवर असलेल्या हक्काबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. माननीय न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान असे नमूद केले आहे की ज्या मुलींना आपल्या वडिलांसोबत नातेसंबंध ठेवायचे नाहीत तर अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीत अधिकार राहणार नाही.
खरे तर हिंदू उत्तर अधिकारी कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत मुलांप्रमाणेच समान अधिकार मिळतो. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये विवाहित मुलींसाठी देखील समान अधिकार देण्यात आले आहेत.
मात्र, ज्या मुली वडिलांसोबत नाते संबंध ठेवू इच्छित नाहीत त्या मुलींना वडिलांच्या संपत्तीत कोणताच अधिकार नसतो असा महत्त्वाचा निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाने यावेळी दिला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयात एक घटस्फोटाचे प्रकरण आलं होतं. यामध्ये पतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाने पती-पत्नीच्या मध्यात समेट घडवूनन आणण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र हे काही होऊ शकले नाही. शिवाय या दांपत्याला एक मुलगी आहे जिने आपल्या वडिलांसोबत राहण्यास नकार दिला. मुलीने वडिलांसोबत कोणतेच नातेसंबंध ठेवायचे नाही असे सांगितले. या प्रकरणांमध्ये खरतर मुलगी 20 वर्षाची असून ती जन्म झाल्यापासूनच आपल्या आई सोबत राहत आहे.
यामुळे या प्रकरणात निकाल देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने मुलगी वडिलांसोबत नातेसंबंध ठेवण्यास नकार देत असल्याने तिला वडिलांच्या संपत्तीत कोणताच अधिकार मिळणार नाही असा महत्त्वाचा निकाल दिला आहे.
न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मुलगी प्रौढ आहे आणि तिचे वय 20 वर्षे आहे आणि ती स्वतःचा निर्णय घेण्यास सक्षम आणि स्वतंत्र आहे.
म्हणून जर तिला वडिलांसोबत संबंध ठेवायचे नसतील तर वडिलांच्या संपत्तीवर आणि पैशावर देखील तिचा हक्क राहणार नाही. यासोबतच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने पतीला मासिक 8,000 रुपये किंवा पत्नीला एकरकमी 10 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
हिंदू उत्तर अधिकारी कायद्यानुसार मुलींना वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीत समान अधिकार मिळतो. मात्र जर मुलगी आपल्या वडिलांसोबत नातेसंबंध ठेवू इच्छित नसेल तर तिला अधिकार मिळणार नाही. मात्र वडील आपल्या मुलींसोबत नातेसंबंध तोडू शकत नाही. वडिलांना मुलीचे पालन पोषण करणे आवश्यक आहे.