Property Rights : देशात संपत्तीवरून अनेक वाद व्यापायला मिळतात. काही वादविवाद तर कोर्टातही जातात. माननीय न्यायालय मग अशा प्रकरणांमध्ये निकाल देते. संपत्तीवरून होणारे कुटुंबातील वाद विवाद अनेकदा आपसी सहमतीने सुटत नाहीत आणि अशा प्रकरणांमध्ये लोक कोर्टात धाव घेतात.
गुजरात मध्ये देखील संपत्तीचे असेच एक प्रकरण हायकोर्टात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात मधील एका महिलेने दोन लग्न केली होती. दोन्ही लग्नातून जन्मलेल्या महिलेच्या अपत्यांमध्ये संपत्तीबाबत वादविवाद झाले होते.
हे प्रकरण माननीय गुजरात हायकोर्टाच्या पुढ्यात आले. दरम्यान यां प्रकरणात माननीय गुजरात हायकोर्टाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय दिला आहे. सध्या या निर्णयाची विशेष चर्चा देखील पाहायला मिळत आहे.
या प्रकरणात माननीय गुजरात हायकोर्टाने असे म्हटले आहे की, हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या कलम 15 नुसार, जेव्हा विधवा मृत्यूपत्र न सोडता मरण पावते, तेव्हा तिचा मुलगा आणि मुलगी किंवा बेकायदेशीर संबंधातून जन्मलेल्या मुलांसह तिच्या वारसांनाही तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याचा समान हक्क आहे.
काय होत प्रकरण ?
या प्रकरणात मालमत्तेचे मूळ मालक माखनभाई पटेल होते, त्यांनी त्यांची पत्नी कुंवरबेन (कुंवरबेन यांचा हा दुसरा विवाह होता, माखनभाई त्यांचे दुसरे पती होते) यांच्यासह त्यांच्या दोन मुलांना वारस केले होते.
1982 च्या महसूल अभिलेखातही याची नोंद सुद्धा करण्यात आली होती. नंतर, मग कुंवरबेन यांनी पूर्वीच्या लग्नातील त्यांच्या मुलाच्या विधवेच्या नावे जमिनीच्या अविभाजित वाट्याचे मृत्युपत्र केले.
पण मामलतदार आणि उपजिल्हाधिकारी त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची महसूल अभिलेखात नोंद करण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी उच्च न्यायालयात आक्षेप नोंदवला. याचिकाकर्ते हे कुंवरबेन यांच्या सुनेचे वारस आहेत, जे कुंवरबेन यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेत तिचा हिस्सा मागत होते. दरम्यान हे प्रकरण गुजरात हायकोर्टात न्यायमूर्ती ए. पी. ठाकर यांच्या समक्ष सुनावणीसाठी आले.
यावर सुनावणी देताना माननीय न्यायालयाने या प्रकरणातील मृत विधवा ही मालमत्तेच्या मालकांपैकी एक असल्याने तिला तिचा अविभाजित हिस्सा कोणालाही देण्याचा अधिकार होता, तसेच यां प्रकरणात मृत्युपत्राला उच्च न्यायालयात कोणीही आव्हान दिलेले नव्हते यामुळे मृत विधवेला ही मालमत्ता कोणालाही देण्याचा अधिकार होता.
पुढे कोर्टाने असेही म्हटले आहे की, ‘येथे हिंदू उत्तराधिकार कायद्याचा संदर्भ घेणे आवश्यक आहे, ज्याच्या अंतर्गत कलम 15 नुसार हिंदू विधवा तिच्या दुसऱ्या पतीकडून जमिनीचा वारसा घेऊ शकते आणि तिच्या पहिल्या लग्नापासून जन्मलेल्या तिची मुले देखील वारसा हक्काने जमीन घेऊ शकतात, ते म्हणजेच पहिल्या पतीची अपत्य दुसऱ्या पतीच्या जमिनीत वारस असू शकतो.
या प्रकरणात मालमत्ता ही वडिलोपार्जित मालमत्ता असून, दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मृत्युपत्राच्या लाभार्थीला हक्क सांगितलेल्या मालमत्तेवर हक्क मिळू शकतो, असे सांगण्यात आले.