Property Rights : भारतीय संस्कृतीत काळानुरूप थोडासा बदल पाहायला मिळत आहे. खरे तर दीडशे वर्षे इंग्रजांनी आपल्यावर अधिराज्य गाजवले मात्र गुलामीच्या काळातही तेव्हाच्या भारतीयांनी पाश्चिमात्य संस्कृतीला भारतीय संस्कृतीवर हावी होऊ दिले नाही.
आता मात्र भारत इंग्रजांच्या तावडीतून आझाद झाल्यानंतर भारताच्या संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा पाहायला मिळत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 76 वर्ष चार महिने आणि 10 दिवसांचा काळ पूर्ण झाला आहे.
पण या जवळपास आठ दशकांच्या काळातही भारत पाश्चिमात्य संस्कृतीचा गुलामच राहिला आहे. भारतीय संस्कृतीत आता पाश्चिमात्य लोकांची संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे आतापर्यंत गाव-खेडे या विदेशी संस्कृतीपासून लांब होते पण आता या ग्लोबलायझेशनच्या युगात भारताच्या ग्रामीण भागातही पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रसार हळूहळू वाढू लागला आहे.
युरोप आणि अमेरिकेच्या धर्तीवर भारतातही लग्नाआधी मुले-मुली एकत्र राहतात. ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप असे नाव देण्यात आले आहे. बरेच जोडपे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहतात जेणेकरून ते दोघे लग्नासाठी सुसंगत आहेत की नाही हे ठरवू शकतील.
पण आपल्या भारतीय संस्कृतीत मुलगा आणि मुलगी लग्नापूर्वी एकत्र राहणे योग्य मानले जात नाही. मात्र कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपला मान्यता दिली आहे. गेल्या 17 वर्षांपूर्वी कोर्टाने याला मान्यता दिली आहे.
अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून लिव इन रिलेशनशिपमध्ये जन्मलेल्या मुलाला वडीलोपार्जित संपत्ती मध्ये हिस्सा मिळतो की नाही असा सवाल उपस्थित केला जात होता.
दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लिव्ह-इन रिलेशनशिप दरम्यान मुलाचा जन्म झाला, तर त्याचाही तेवढाच हक्क असतो जो मुलाचा त्याच्या वडिलांवर असतो.
एक महिला मुलांच्या हक्कांसाठी याचिका दाखल करू शकते. यासह, वडिलांनी घेतलेल्या किंवा तयार केलेल्या मालमत्तेमध्ये अधिकार दिले जातात.
पण वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत सदर मुलाचा हक्क राहणार नाही हे लक्षात ठेवा. घरगुती हिंसाचाराच्या कलम 16 अंतर्गत याचिका दाखल करण्याचा हा कायदेशीर अधिकार महिलेला मिळतो.
अर्थातच लिव्ह इन रिलेशनशिप दरम्यान जन्मलेल्या मुलाला त्याच्या वडिलांच्या वडीलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळणार नाही, पण बापाने स्वतः कमावलेल्या संपत्तीवर सदर मुलाचा अधिकार राहणार आहे.