Property Rights : हिंदू उत्तराधिकारी कायद्याने संपत्तीचे अधिकार ठरवलेले आहेत. या कायद्यात मुलींना देखील समान अधिकार देण्यात आले आहेत. वडिलोपार्जित संपत्तीत मुलाला आणि मुलीला समान अधिकार देण्याचे प्रावधान या कायद्यात आहे.
यामुळे स्त्री पुरुष समानतेला चालना मिळाली आहे. मात्र असे असले तरी अनेकांच्या माध्यमातून आईच्या वडिलांच्या (आजोबा) संपत्तीत आम्हाला अधिकार मिळणार का हा सवाल उपस्थित केला जात होता.
आईला तर तिच्या वडिलांच्या संपत्तीत अधिकार मिळवण्याचा अधिकार आहे मात्र नातवंडांना देखील त्यांच्या बाबांच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
दरम्यान याबाबत कायदे तज्ञांनी काय माहिती दिली आहे तसेच सुप्रीम कोर्टाने याबाबत काय म्हटले आहे याविषयी आता आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय सांगतो कायदा ?
हिंदू अधिकारी कायद्यानुसार मुलीला आपल्या वडिलांच्या संपत्तीत पूर्ण अधिकार मिळतो. मुलगी विवाहित असली तरी देखील तिला तिच्या वडिलांच्या संपत्ती संपूर्ण अधिकार देण्यात आला.
मुलाला आणि मुलीला विवाह नंतर देखील समान अधिकार देण्याचे प्रावधान या कायद्यात आहे. मात्र मुलीच्या मुलांना त्यांच्या आजोबाच्या संपत्तीत अधिकार मिळतो का ? तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर एखाद्या महिलेचा मृत्यू झाला असेल तर अशा महिलेच्या अपत्यांना अर्थातच मुलगी असो किंवा मुलगा त्यांना तिच्या वडिलांच्या संपत्तीवर दावा ठोकण्याचा संपूर्ण अधिकार राहणार असा महत्वाचा निर्णय दिलेला आहे.
अर्थातच सदर महिला जीवित असताना तिच्या मुलांना तिच्या वडिलांच्या संपत्तीवर दावा सांगता येणार नाही मात्र जेव्हा तिचे निधन होईल तेव्हा त्या मुलांना त्यांच्या आजोबाच्या संपत्तीवर दावा ठोकता येणार आहे.