Property Tips : घर खरेदी करणे हे आयुष्यातील सर्वात मोठी अचिव्हमेंट समजली जाते. ही उपलब्ध साध्य करण्यासाठी मात्र आयुष्यातील सर्व जमापुंजी खर्च होत असते. स्वतःचे घर घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि बचत करावी लागते यात शन्काचं नाही. अलीकडे तर घरांच्या किमती विक्रमी वाढल्या असल्याने घर खरेदी करण्यासाठी सर्वसामान्यांना अगदी तारेवरची कसरत करावी लागते.

जीवाचा आटापिटा करून घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होत असते. मात्र घर खरेदीची खरेदीची प्रक्रिया कठीण अन खूपच गुंतागुंतीची असते. घराप्रमाणेचं जमिनीची खरेदी करणे देखील तेवढीच कठीण आणि खर्चिक बाब आहे.

Advertisement

यात सर्वसामान्यांना अनेक कायदेशीर आणि आर्थिक अडथळे सहन करावे लागतात. जमीन तसेच घरासारख्या मालमत्तेची नोंदणी करणे त्रासदायक ठरते. तसेच या कामासाठी अतिरिक्त पैसे सुद्धा खर्च होत असतात.

अशातच अनेकांच्या माध्यमातून घर खरेदी करताना आवश्यक असणाऱ्या नोंदणीसाठी की जमीन खरेदीच्या नोंदणीसाठी अधिक पैसा खर्च करावा लागतो असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

Advertisement

दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे थोडक्यात उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

कोणाच्या खरेदीवर अधिक पैसा लागतो

Advertisement

खरेतर मालमत्तेच्या खरेदीवेळी नोंदणी शुल्कावर सूट मिळतं असते. पण, ही सूट मालमत्ता शहरी भागात आहे की ग्रामीण भागात आहे यावर अवलंबून असते. साधारणपणे, ग्रामीण भागात नोंदणी शुल्क हे सर्कल रेटच्या 4 ते 5 टक्के असते आणि शहरी भागात ते 6 टक्क्यांच्या जवळपास असते.

याशिवाय महिलांच्या नावे खरेदी केलेल्या मालमत्तेसाठी विशेष सूट दिली जात आहे. म्हणजे घर असो की जमीन कोणत्याही प्रकारची मालमत्ता असेल तर त्याच्या नोंदणीसाठी एका ठरवून दिलेल्या सर्कल रेटनुसार खर्च करावा लागतो.

Advertisement

मालमत्ता खरेदी करताना काय काळजी घ्याल

मालमत्ता खरेदी करताना फसवणूक होण्याची देखील भीती असते. यामुळे याची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी नोंदणी कागदपत्रे काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असते.

Advertisement

याव्यतिरिक्त, विक्रेत्याने मालमत्ता कशी मिळवली हे निर्धारित करण्यासाठी आणि योग्य मालक म्हणून त्यांची वैधता सत्यापित करण्यासाठी त्या संबंधित मालकीचा इतिहास तपासणे महत्वाचे आहे.

भविष्यात संभाव्य कायदेशीर समस्या किंवा विवाद टाळण्यासाठी तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करताना योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *