Pune Ahmednagar Railway News : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे.
खरे तर, येत्या काही दिवसात होळीचा आणि धुलीवंदनाचा सण येणार आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पण या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. हेच कारण आहे की आता मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने पुणे ते दानापुर आणि पुणे ते गोरखपूर या मार्गावर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला असून या दोन्ही विशेष गाड्या अहमदनगरमार्गे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परिणामी, या विशेष गाड्यांमुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण या दोन्ही विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पुणे ते दाणापूर अतिजलद विशेष रेल्वेगाडीचे वेळापत्रक कसं राहणार ?
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून २१ मार्चला सकाळी साडे सहा वाजता सुटणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही विशेष रेल्वेगाडी दाणापूर येथून २२ मार्चला दुपारी दिड वाजता सुटणार आहे.
पुणे ते दानापूर विशेष रेल्वेला कुठे मिळणार थांबा ?
मध्य रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही गाडी राज्यातील हडपसर (फक्त पुणे ते दाणापूरसाठी), दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार आहे.
तसेच राज्याबाहेरील खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या रेल्वे स्थानकावर देखील ही गाडी थांबा घेणार अशी शक्यता आहे.
पुणे ते गोरखपूर विशेष रेल्वेगाडीचे वेळापत्रक ?
ही गाडी पुणे येथून २२ मार्चला दुपारी ४.१५ वाजता सुटणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी गोरखपूर येथून २३ मार्चला रात्री ११.२५ वाजता सुटणार आहे.
कुठे थांबणार विशेष ट्रेन
पुणे ते गोरखपूर विशेष रेल्वेगाडी या मार्गांवरील दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओराई, कानपूर, लखनौ, गोंडा, मानकापूर, बस्ती आणि खलीलाबाद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.