Pune Airlines : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. 15 ऑक्टोबर पासून देशात नवरात्र उत्सवाचा पावन पर्व सुरू होणार आहे. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच 24 ऑक्टोबरला देशातील विविध राज्यांमध्ये विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे.
शिवाय पुढल्या महिन्यात दिवाळीचा मोठा सणही राहणार आहे. अशा या सणासुदीच्या कालावधीतच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातून आता सुरत साठी थेट विमान सेवा सुरू होणार आहे.
खरंतर पुण्यातून गुजरात येथील सुरतला दर दिवशी हजारो नागरिक जातात. सुरतहुन पुण्याला येणाऱ्यांची संख्या देखील विशेष उल्लेखनीय आहे. दरम्यान सुरत ते पुणे आणि पुणे ते सुरत असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे स्पाइस जेट या एअरलाइन्स कंपनीने सुरत ते पुणे दरम्यान थेट विमान सेवा सुरू करण्याचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. विशेष बाब अशी की, सुरत ते गोवा दरम्यानही थेट विमान सेवा सुरु होणार आहे. दरम्यान सुरत ते पुणे आणि सुरत ते गोवा या दोन्ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
एवढेच नाही तर भविष्यात सुरतहुन जयपुर आणि मुंबईसाठी देखील विमानसेवा सुरू करण्याचा प्लॅन आखला जात आहे. यामुळे लवकरच राजधानी मुंबई ते सुरत दरम्यानचा प्रवास देखील आणखी गतिमान होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. तूर्तास आपण सुरत ते गोवा आणि सुरत ते पुणे या मार्गावरील विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं आहे सुरत ते पुणे विमानसेवेचे वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत ते पुणे दरम्यान दररोज विमान उड्डाण भरणार आहे. मात्र शनिवारी या मार्गावरील वेळापत्रकात मोठा बदल राहणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी स्पाइसजेटचे विमान पुणे एअरपोर्टवरून दुपारी 3.10 वाजता टेकऑफ घेईल आणि 4.20 वाजता सुरत विमानतळावर लँड होईल. तसेच सूरत विमानतळावरून सकाळी 6.20 वाजता उड्डाण भरेल आणि एक तास 20 मिनिटांचा प्रवास करून पुण्याला सकाळी 7.40 वाजता पोहोचेल. पण शनिवारी हे विमान पुण्याहून सकाळी 7.50 वाजता उड्डाण भरेल आणि सकाळी 9.00 वाजेच्या सुमारास सुरत विमानतळावर लँड होणार आहे.
कसं असेल सुरत ते गोवा विमानसेवेचे वेळापत्रक
हाती आलेल्या माहितीनुसार, सुरत विमानतळावरून गोव्यासाठी संध्याकाळी 5.20 वाजता फ्लाईट असेल आणि 6.50 वाजता ही फ्लाईट गोव्याला पोहोचणार आहे. तसेच गोवा ते सुरत प्रवासाचा विचार केला असता गोव्याहून संध्याकाळी 7.20 वाजता फ्लाईट असेल आणि रात्री 9.05 वाजता सुरतला ही फ्लाईट पोहोचणार आहे. गोव्यासाठी सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी विमान उड्डाणे सुरु राहतील. म्हणजेच गुरुवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे.
तिकीट दर काय राहतील बरं?
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आलेल्या माहितीनुसार, सुरत ते गोवा आणि सुरत ते पुणे या दोन्ही विमानसेवेसाठी जवळपास चार हजार रुपये ते 4500 रुपये प्रति व्यक्ती तिकीट दर आकारले जाऊ शकतात. निश्चितच या विमानसेवेमुळे सुरत ते पुणे आणि सुरत ते गोवा हा प्रवास गतिमान होणार आहे यात शंकाच नाही.