Pune Bus News : पुण्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास आहे. कारण की, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने या मार्गावरील वातानुकूलित म्हणजेच एसी बसच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. खरंतर, शैक्षणिक, व्यावसायिक कामासाठी कोल्हापूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उरलेली आहे.
तसेच करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी पुण्याहूनही दररोज हजारो प्रवासी कोल्हापूर शहरात दाखल होतात. अशा परिस्थितीत, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे हा प्रवास आरामदायक व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने मार्गावरील बसची संख्या 40 पर्यंत वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे. आता या मार्गावर साधी बस, जन शिवनेरी, इलेक्ट्रिक शिवाई तसेच शिवशाही बस दर अर्ध्या तासाने सोडली जात आहे. वास्तविक या मार्गावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे.
तसेच महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात येत्या काही दिवसांमध्ये नवरात्र उत्सव आणि विजयादशमीचा सण साजरा होणार आहे. यानंतर दिवाळीच्या सणाला देखील सुरुवात होणार आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्येत आगामी काही दिवसामध्ये आणखी वाढ होणार आहे.
दरम्यान या सणासुदीच्या काळात या मार्गावरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी बसच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय परिवहन महामंडळाने घेतला आहे. खरंतर या मार्गावर बसच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत अशी मागणी प्रवाशांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून जोर धरत होती.
अखेर प्रवाशांची ही मागणी आता पूर्ण झाली असून या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या 40 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पहाटे 5 पासून रात्री साडे अकरा पर्यंत दर अर्ध्या तासाला कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर बस सोडली जात आहे.