Pune Cheapest Shoe And Chappals Market : तुम्हीही पुणेकर आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष महत्त्वाची आणि कामाची राहणार आहे. खरे तर पुणे शहराचा भारतातील सर्वाधिक महागड्या शहरांमध्ये समावेश होतो. पुणे शहरात राहणे, फिरणे, शॉपिंग, घर खरेदी, कपडे, शूज, चप्पल इत्यादी महाग आहे.
यामुळे देशातील सर्वाधिक महागड्या शहरांच्या यादीत पुण्याचा देखील समावेश होतो. मात्र असे असले तरी पुण्यात असेही काही मार्केट आहेत जिथे रोजच्या वापरातील काही वस्तू स्वस्तात मिळतात.
दरम्यान आज आपण पुण्यातील अशा मार्केटची माहिती पाहणार आहोत जिथे शूज आणि चप्पल खूपच स्वस्तात मिळतात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या मार्केटची सविस्तर माहिती.
पुण्यात सर्वात स्वस्त शूज किंवा चप्पल कुठे मिळतात ?
जर तुम्हीही पुण्यात स्वस्त शूज किंवा चप्पलसाठी चांगले नामांकित अन स्वस्त मार्केट शोधत असाल तर पुण्यातील एफसी रोड अर्थातच फर्ग्युसन रोडवरील 2 मार्केट तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे.
हे मार्केट तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. एफसी रोडला असणाऱ्या मार्केटमध्ये स्वस्तात चप्पल आणि शूज मिळतात.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, एफसी रोडवर असणाऱ्या शिरोळे मार्केट आणि केसरिया मार्केट या दोन लोकप्रिय शॉपिंग डेस्टिनेशनवर तुम्हाला स्वस्तात शूज किंवा चप्पल मिळू शकणार आहेत.
या दोन्ही मार्केटमध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सँडल्स, चप्पल खरेदी करता येणार आहेत. पण या वस्तूच्या खरेदीसाठी तुम्हाला या मार्केटच्या आतल्या भागात जावं लागणार आहे.
तुम्हाला येथे तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी करता येतील. येथे चप्पल, सॅंडल, शूज, स्लीपर, लोफर, ट्रॅक शूज असे विविध प्रकारचे शूज परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होतात.
या मार्केटची विशेषता म्हणजे तुम्हाला अवघ्या शंभर रुपयांपासून येथे चप्पल, सॅंडल मिळू शकतात. मात्र किमतीनुसार कॉलिटीमध्ये बदल होतो. सध्या जे शूज चप्पल सॅंडल ट्रेंडिंग मध्ये आहेत ते सारे आर्टिकल या मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील.
येथे तुम्हाला शूज सॅंडल चप्पल कॉम्बो ऑफर मध्ये देखील मिळतात. जसे की 399 रुपयांमध्ये तीन सॅंडल 999 रुपयांमध्ये सँडल, बेली शूज आणि स्पोर्ट शूजचे कॉम्बिनेशन इथं तुम्हाला खरेदी करता येणे शक्य आहे.