Pune Lottery News : पुणेकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. विशेषतः म्हाडा पुणे मंडळाअंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्रात घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ही एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडा पुणे मंडळ तब्बल 5000 घरांसाठी लवकरच सोडत काढणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, 14 ऑगस्ट रोजी म्हाडा मुंबई मंडळाच्या 4 हजार 82 घरांसाठीच्या योजनेची लॉटरी काढण्यात आली आहे. ही लॉटरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात आली होती.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाच्या आगामी सोडतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळातील घरांसाठी लवकरच सोडत काढली जाणार अशी घोषणा केली होती.
याच घोषणाच्या अनुषंगाने कोकण मंडळांने साडेचार हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. तसेच पुणे मंडळाने देखील 5,000 घरांसाठी देखील सोडत काढण्याची तयारी सुरू केली आहे. पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
अशोक पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे पुणे मंडळ ऑक्टोबर महिन्यात 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. विशेष म्हणजे अशोक पाटील यांनी या पाच हजार घरांसाठीच्या लॉटरीची जाहिरात केव्हा निघणार याबाबत देखील सांगितले आहे.
त्यांनी या 5000 घरांसाठीच्या योजनेची जाहिरात 25 ऑगस्ट रोजी निघणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच अर्ज विक्री आणि स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मग सादर झालेल्या अर्जांपैकी पात्र अर्जदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
यानंतर मग या पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत ऑक्टोबर मध्ये काढली जाईल आणि विजेत्या ठरलेल्या लोकांना मग घराचा ताबा दिला जाईल. या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश राहणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
निश्चितच म्हाडा पुणे मंडळाच्या घर सोडतीची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच राहणार आहे. तसेच पुणे मंडळाची पाच घरांसाठीची जाहिरात 25 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असल्याने इच्छुक व्यक्तींना आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.