Pune Metro News : गेल्या काही वर्षांपासून पुणे, मुंबई नागपूर यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. यामुळे या महानगरांमधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. पुणे, नागपूर आणि मुंबईमध्ये मेट्रोची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत.
पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे शहरात सध्या स्थितीला पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरु आहे.
विशेष बाब अशी की पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गाचा विस्तारित भाग अर्थात सिविल कोर्ट ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यांमध्ये पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार अशी खात्रीलायक बातमी महा मेट्रोच्या सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी एक आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणेकरांचे एक मोठे स्वप्न आता प्रत्यक्षात खरे उतरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिंपरीते निगडी पर्यंतच्या मेट्रो मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
यामुळे पुणेकरांना नजीकच्या भविष्यात पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. परिणामी पुणेकरांचा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे.
या मार्गाच्या बांधकामाला तर सुरुवात झालीच आहे शिवाय हा मार्ग अडीच वर्षातच पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
खरे तर स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महापालिका या मेट्रो मार्गाचा विस्तार करून निगडी भागातील भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो मार्ग तयार केला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून केली जात होती.
दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर या विस्तारित मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली असून आता या मार्गाचे प्रत्येक्षात काम सुरू झाले आहे. खरे तर या प्रकल्पाचे भूमिपूजन नुकत्याच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्ण झाले आहे.
भूमिपूजन पूर्ण झाले असल्याने लवकरात लवकर याचे बांधकाम देखील सुरू होणे अपेक्षित होते. यानुसार, आता याचे बांधकामही सुरू झाले आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला माती परीक्षण करून ले-आउट तयार करण्यात येणार आहे.
त्यानंतर पिलर बांधण्याचे काम सुरू होणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक हे चार मेट्रो स्थानकं विकसित होणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुरू झाल्यानंतर निगडी मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.