Pune Metro News : पुणे शहरात मेट्रोचे जाळे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि गतिमान व्हावा यासाठी शहरातील विविध भागांना मेट्रोची भेट दिली जात आहे. आतापर्यंत शहरात दोन मेट्रो मार्ग अंशता सुरू झाले असून उर्वरित मेट्रो मार्गांचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहरातील दोन मेट्रो मार्ग अंशता सुरू करण्यात आलेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी यापैकी वनाज ते रुबी हॉल क्लिनिक हे दोन मार्ग सुरू झालेत.
हे मार्ग अंशता सुरू झाले असल्याने पुणेकरांचा प्रवास मात्र गतिमान झाला आहे. तथापि, या मार्गाचे राहिलेले टप्पे केव्हा सुरू होणार हा सवाल पुणेकरांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केला जात होता. दरम्यान रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
खरेतर या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावर अखेर मेट्रो केव्हा धावणार ? हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. दरम्यान या मार्गावर मेट्रो सुरू व्हावी यासाठी मागील आठवड्यात सुरक्षा आयुक्तांच्या एका चमूने या मार्गाची पाहणी पूर्ण केली आहे.
या मार्गाची सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने तपासणी पूर्ण केल्यानंतर आता कालपासून अर्थातच 19 जानेवारी 2023 पासून केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या माध्यमातून या मार्गाची अंतिम तपासणी सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांच्या माध्यमातून ही तपासणी पूर्ण केली जाणार असून 22 जानेवारीपर्यंत ही तपासणी पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे. खरे तर मेट्रो सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने मागीला ठेवण्यात केलेल्या तपासणीत या मार्गात काही त्रुटी असल्याचे सांगितले होते.
यानुसार महा मेट्रोने त्रुटी दूर केल्या आहेत. यानंतर आता केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त पुण्यात दाखल झाले असून त्यांच्या माध्यमातून या मार्गाची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे.
22 जानेवारीपर्यंत ही तपासणी सुरू राहणार आणि त्यानंतर केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त या मार्गाला हिरवा कंदील दाखवणार आहेत.
सुरक्षा आयुक्तांच्या माध्यमातून या मार्गासाठी हिरवा कंदील मिळाल्यानंतर मग महा मेट्रो हा मार्ग सुरू करण्यासाठी राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहे.
यानंतर मग राज्य शासन हा मार्ग सुरू करण्याची तारीख निश्चित करेल आणि मग त्या निश्चित दिवसापासून पुणेकरांच्या सेवेत हा मेट्रो मार्ग दाखल होणार आहे. एकंदरीत येत्या काही दिवसात पुणेकरांना रामवाडी पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.