Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. सध्या शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू असून इतरही अन्य ठिकाणी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली आहे.
त्यामुळे लवकरच संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे जाळे तयार होणार आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 33 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग सुरू होणार असून यापैकी 24 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सध्या सुरू आहेत.
सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या 24 किलोमीटर लांबीच्या मार्गांवर मेट्रो सुरू आहे.
विशेष म्हणजे सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या 9 किलोमीटर लांबिच्या मेट्रो मार्गांचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान सध्या सुरू असलेल्या पुणे मेट्रो संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, आता पुणे मेट्रोच्या फेऱ्या वाढणार आहे. याची अंमलबजावणी मात्र एक जानेवारी 2024 पासून होणार आहे.
गर्दीच्या वेळी म्हणजे पीक अवर्स आणि नॉन पिक अवर्स मध्येही लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत. मेट्रोला प्रवाशांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या नवीन निर्णयानंतर आता पीक अवर्स मध्ये दर साडेसात मिनिटांनी मेट्रो धावणार आहेत तर नॉन पीक अवर्स मध्ये दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे.
दरम्यान प्रशासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे आता पीसीएमसी म्हणजेच पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर 32 अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.
ते रुबी हॉल क्लीनिक या मार्गावर 31 अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे पुणे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
प्रशासनाने घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयामुळे एक जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षात पुणेकरांचा मेट्रो प्रवास अधिक सुलभ आणि जलद होईल अशी आशा आहे.