Pune Metro News : पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर महा मेट्रोने सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रोची सेवा सुरू झाली होती.
यानंतर या चालू वर्षात रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी यापर्यंतची विस्तारित मेट्रो सेवा सुरू झाली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास जलद आणि सुरक्षित झाला आहे.
मात्र एक मार्च 2024 पासून पुणे मेट्रो प्रशासनाने रिटर्न तिकीट बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला. याचा फटका मेट्रो प्रवाशांना सहन करावा लागत होता.
रिटर्न तिकीट उपलब्ध नसल्याने मेट्रो ने प्रवास करताना घडी घडी तिकीट काउंटर वर जाऊन तिकीट काढावे लागत आहे. आता मात्र या समस्येचा उतारा म्हणून पुणे मेट्रो प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने दैनिक पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे मेट्रो ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.
शंभर रुपयात दिवसभर गारेगार प्रवास
पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशांना फक्त शंभर रुपयात दैनिक पास उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या पासचा उपयोग करून प्रवासी दिवसभर मेट्रो प्रवास करू शकणार आहेत. सध्या स्थितीला मेट्रोची सेवा सकाळी सहा वाजेपासून सुरू होते आणि रात्री दहा वाजेपर्यंत राहते.
दरम्यान, या कालावधीत आता दैनिक पास काढून प्रवाशांना प्रवास करता येणे शक्य होणार आहे. म्हणजे 100 रुपयांचा पास काढून दिवसभर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
या दैनिक पासची सर्वात मोठी विशेषता म्हणजे एक दिवसाचा पास काढून कितीही वेळ मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
पण, एक दिवसाचा पास काढला म्हणजे 100 रुपयाचा दैनिक पास काढला आणि अवघ्या काही अंतरावर मेट्रोने प्रवास केला, त्यानंतर मेट्रोने प्रवास करणे शक्य झाले नाही तर भरलेली रक्कम परत मिळणार नाही, याची नोंद मात्र प्रवाशांनी घ्यायची आहे. तसेच या पाससाठी कोणतीही सवलत मिळणार नाही.