Pune Metro News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रोसंदर्भात. खरे तर सध्या स्थितीला शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे. तसेच या दोन मार्गांच्या विस्तारित टप्प्याचे देखील काम सुरू आहे.
सिविल कोर्ट ते स्वारगेट आणि रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मेट्रो मार्गांचे सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यापैकी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या मार्गाचे काम पूर्ण झाले असून या मार्गाच्या लोकार्पणाची तारीख देखील ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी पर्यंतचा विस्तारित मेट्रो मार्ग 6 मार्च 2024 ला सुरु होणार आहे.
या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे उद्घाटन संपन्न होणार अशी माहिती समोर येत आहे.
या मार्गाचे उद्घाटन गेल्या महिन्यात अर्थातच 19 फेब्रुवारी 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार असा दावा केला जात होता.
या पार्श्वभूमीवर महा मेट्रो ने आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली होती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मिळाला नसल्याने गेल्या महिन्यात या मार्गाचे उद्घाटन होऊ शकले नाही.
आता मात्र या मार्गाचे उद्घाटन 6 मार्चला होणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता थेट रामवाडी पर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे या मार्गावरील मेट्रो सेवेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यामुळे या भागातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे.
रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यानंतर वनाज ते रामवाडी असा 16 किलोमीटरचा मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.