Pune Metro News : पुणेकरांना गेल्या महिन्यात एक मोठी भेट मिळाली आहे. गेल्या महिन्यात शहरातील दोन महत्त्वाचे मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक असे दोन महत्त्वाचे मार्ग सुरू झाले आहेत.
या मार्गांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. हे मार्ग प्रवासी सेवेत दाखल झाल्यानंतर शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान झाला आहे. पुणेकरांनी या दोन्ही मार्गांवरील मेट्रोला भरभरून असा प्रतिसाद देखील दाखवला आहे. रोजाना 60 ते 65 हजार नागरिक या मेट्रो मार्गावरून प्रवास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहरात मेट्रो मार्ग चार आणि पाचचे काम देखील लवकरच सुरू होणार असल्याचे चित्र आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी इथे नमूद करू इच्छितो की, पुणे मेट्रोचा पहिला मार्ग पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असा आहे.
यापैकी सिविल कोर्ट ते पिंपरी चिंचवड हा मार्ग सुरू झाला असून सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानच्या मार्गाचे काम सुरू आहे. याशिवाय पुणे मेट्रोचा दुसरा टप्पा वनाज ते रामवाडी असा आहे. यापैकी वनाज येथील गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला आहे. रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मार्गाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे.
हे संपूर्ण संपूर्ण मार्ग येत्या काही महिन्यांमध्ये पुणेकरांच्या सेवेत दाखल होतील असा आशावाद व्यक्त होत आहे. याशिवाय पुणे मेट्रोचा तिसरा मार्ग म्हणजेच शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानचे काम सध्या स्थितीला अंतिम टप्प्यात आले आहे. हा 23 किलोमीटर लांबीचा मार्ग येत्या काही दिवसात पुणेकरांच्या सेवेत दाखल करण्यासाठी पुणे मेट्रो कडून प्रयत्न केले जात आहेत.
अशातच आता पुणे शहरातील मेट्रो मार्गाच्या आणि पाच बाबत महत्त्वाची अशी माहिती हाती आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीएकडून शहरातील मेट्रोमार्ग चार आणि पाच बाबत विचार केला जात आहे. विशेष म्हणजे या मेट्रो मार्गांना पुणे महानगरपालिकेने मंजुरी देखील दिली आहे.
दिल्ली मेट्रोकडून याबाबतचा प्रोजेक्ट रिपोर्ट देखील तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा रिपोर्ट पीएमआरडीएने आता मागवला आहे. यानुसार शिवाजीनगर ते लोणी काळभोर दरम्यान मेट्रो मार्ग चार विकसित केला जाणार आहे. तसेच खडकवासला ते खराडी दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.
दरम्यान या दोन्ही मार्गांवरील मेट्रोच्या कामाचा येत्या काही महिन्यात शुभारंभ केला जाणार असून हे मार्ग पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.