Pune Mumbai Expressway : मुंबई आणि पुणे शहरातील नागरिकांचा एक मोठी बातमी आहे. भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे.
खरे तर पुण्याहून मुंबईला आणि मुंबईहून पुण्याला प्रवास करणारे बहुतांशी प्रवासी रस्ते मार्गाने प्रवास करतात. पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
दरम्यान जर तुम्हीही आज आणि उद्या या एक्सप्रेस वे ने प्रवास करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. ती म्हणजे हा महामार्ग आज आणि उद्या काही ठराविक कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेला असेल.
मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर कि.मी. ९३/९०० येथे आज आणि उद्या दुपारी १२ ते २ या दरम्यान गॅन्ट्री बसविण्याचे काम केले जाणार आहे.
हे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केले जाणार असून या कामासाठी हा महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आज आणि उद्या दुपारी बारा ते दोन या कालावधीत या महामार्गावरील मुंबई व पुणे वाहिनीवर सर्व प्रकारच्या हलकी, जड व अवजड वाहनांना बंदी राहणार आहे. परिणामी या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
हा मार्ग आज आणि उद्या दुपारी बारा ते दोन या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रवाशांना इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या दुपारी बारा ते दोन या कालावधीत सांस्कृतिक राजधानी पुण्याहून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने किवळे ब्रिज वरून जुना मुंबई – पुणे मार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास करू शकणार आहेत.
दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईहून पुण्याकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने कुसगाव टोलनाका कि.मी ५५.००० वरुन (लोणावळा एक्झीट) येथून जुना मुंबई -पुणे मार्गावरुन पुणेच्या दिशेने प्रवास करू शकणार आहेत.
दरम्यान या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी महामार्ग बंद असणाऱ्या कालावधीत पर्यायी मार्गांचा अवलंब करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.