Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबई आणि पुणे ही दोन्ही शहरे महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरे आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे.
शिवाय पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखतात. पुणे शहरात वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. याशिवाय अलीकडे हे शहर आयटी कंपन्यांसाठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे शिक्षणासाठी आणि कामांसाठी मुंबईहून पुणे आणि पुण्याहुन मुंबई असा प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे.
सध्या या दोन्ही शहरादरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास केला जात आहे. पूर्वी या महामार्गाने या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास फक्त तीन तासांमध्ये केला जात असे. पण आता मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो.
या मार्गावर रोजाना जवळपास 80 हजार पेक्षा अधिक वाहने धावतात. यामुळे या नवीन महामार्गावर कायमच वाहतूक कोंडी होते. मात्र आता ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने अडीच हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे.
अडीच हजार कोटी रुपये खर्च करून आता या एक्सप्रेस वे ची वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य रस्ते विकास महामंडळ अडीच हजार कोटी रुपये खर्च करून या महामार्गाची एक-एक लेन वाढवणार आहे.
सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा पदरी आहे मात्र हा एक्सप्रेस वे आता आठ पदरी बनवला जाणार आहे. यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.