Pune-Mumbai Expressway : पुणे आणि मुंबईकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, या मार्गावर रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.
पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे. मात्र आता या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज हा मार्ग काही काळासाठी बंद केला जाणार आहे.
वास्तविक, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत. मुंबई आणि पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत काही ठिकाणी भूस्खलन देखील झाली आहे.
या मार्गावर देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. काल रात्री देखील या मार्गावर एका भागात दरड कोसळली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा दरड कोसळू नये यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
या उपायोजना करण्यासाठीच आज काही काळ हा मार्ग बंद केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावर दरड कोसळू नये यासाठी पुन्हा दरडप्रवण क्षेत्रात नव्यानं जाळ्या लावल्या जात आहेत. यामुळे आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
हा मेगा ब्लॉक दुपारी दोन ते चार दरम्यान घेतला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीमध्ये मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार आहे.
जुन्या पुणे मुंबई महामार्गाने ही वाहतूक जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. मात्र, पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र नेहमीप्रमाणेचं सुरळीत सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे.