Pune Nashik Railway : मुंबई-पुणे-नाशिक हे शहर महाराष्ट्राचे सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. मात्र असे असले तरी पुणे ते नाशिक दरम्यान अजूनही थेट रेल्वे मार्ग तयार करण्यात आलेला नाही. यामुळे या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी होती.
दरम्यान, याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग अहमदनगर मार्गे जाणार आहे.
खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी या रेल्वे मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्याचा निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा रेल्वे मार्ग आता शिर्डी मार्गे जाणार असे जाहीर केले आहे.
त्यामुळे या प्रकल्पाचे अंतर 33 किलोमीटरने वाढणार आहे. अशातच आता या रेल्वेमार्गासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे काल अर्थातच 23 फेब्रुवारी 2024 ला या रेल्वे मार्गासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची राजधानी मुंबई येथे भेट घेतली आहे.
या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदय यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली आहे. यामुळे आता या प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
पुणे-नाशिक रेल्वे या हायस्पीड रेल्वे मार्गासाठी 2,500 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे. रेल्वे प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. पुणे आणि नाशिक दरम्यान 235 किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे.
या मार्गावरूनच सेमी हाय स्पीड रेल्वे धावणार आहे. हा मार्ग महारेलकडून तयार केला जाणार आहे.नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तथापि, या रेल्वेमार्गाच्या रूटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन या प्रकल्पाबाबत विस्तृत चर्चा केली असल्याने आता या प्रकल्पाला गती मिळणार आणि येत्या काही दिवसात या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार अशी आशा व्यक्त होत आहे.