Pune New Airport : पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी. हे शहर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवते यामुळे या शहराला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा दर्जा प्राप्त आहे यामुळे. अलीकडे या शहरात विविध आयटी कंपन्यांनी देखील आपले बस्तान बसवले आहे. शिवाय पुणे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.
यामुळे शहरात शिक्षणासाठी आणि कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या खूप उल्लेखनीय आहे. मात्र असे असले तरी पुणे शहराला स्वतःचे विमानतळ नाहीये. सध्या पुणे शहरासाठी लोहगाव या लष्कराच्या विमानतळावरून वाहतूक होत आहे.
अशा स्थितीत पुण्यात नवीन विमानतळ सुरु करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पुरंदर येथे विमानतळ सुरू केले जाणार आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत आहेत. पुरंदर येथील विमानतळासाठी जागेचा देखील शोध घेण्यात आला आहे आणि यासाठी आता जमीन संपादन करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत.
अशातच मात्र पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे आता पुणे जिल्ह्यातील आणखी एका महत्त्वाच्या ठिकाणी वसलेले विमानतळ सुरू केले जाणार आहे. यांसाठी दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे.
दादांनी याबाबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक देखील घेतली आहे. यामुळे आता पुण्याला लवकरच आणखी एका नवीन विमानतळाची भेट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता आपण पुणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी विमानतळ सुरू होणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
कुठे सुरू होणार विमानतळ?
जसं की आपणास ठाऊकच आहे की पुरंदर विमानतळ सुरू करण्यासाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे. आता पवार यांनी जिल्ह्यातील बारामती येथे देखील विमानतळ सुरू करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. आता बारामती येथे देखील विमानतळ सुरु केले जाणार आहे.
यासाठी हालचाली देखील सुरू झाल्या आहेत. बारामतीसह एकूण पाच विमानतळांचा ताबा राज्य औद्योगिक विकास महामंडळ अर्थातच एमआयडीसीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बारामती व्यतिरिक्त नांदेड, लातूर, धाराशिव आणि यवतमाळ या ठिकाणी देखील विमानतळ सुरू केले जाणार आहे. विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीने ही पाचही विमानतळे खाजगी कंपनीला भाडेपट्ट्याने चालवण्यासाठी देण्यात आली होती. पण या ठिकाणी विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे आता ही विमानतळे एमआयडीसीकडे सुपूर्द केली जाणार आहेत.