Pune New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था खूपच मजबूत झाली आहे. खरे तर, सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. विशेष म्हणजे काही तज्ञांनी येत्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास बोलून दाखवला आहे.
दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था जर तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर देशातील दळणवळण व्यवस्था मजबूत बनवावी लागणार आहे. खरंतर, कोणत्याही विकसित देशात तेथील दळणवळण व्यवस्था मोलाची भूमिका निभावत असते.
यामुळे भारतात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. पुण्यात देखील गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाचे कामे पूर्ण झाली असून आगामी काळात रस्त्यांची अनेक प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान देखील नवीन महामार्ग विकसित होणार आहे. छत्रपती संभाजीनगर सहित संपूर्ण मराठवाड्यातील नागरिकांना जलद गतीने सांस्कृतिक राजधानी पुण्यात पोहोचता यावे यासाठी हा नवीन मार्ग तयार होणार आहे.
खरे तर हा महामार्ग आधीच प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान या प्रस्तावित महामार्गाबाबत नुकतीच एक मोठी घडामोड झाली आहे.
सुमारे 22 महिन्यांच्या चर्चेनंतर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर ते पुण्याला जोडणाऱ्या नवीन एक्स्प्रेस वे-ला अखेर केंद्रीय मंत्रालयाकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सत्यापित केलेला हा प्रकल्प बीओटी म्हणजेच बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर या अंतर्गत विकसित केला जाणार आहे.
हा प्रस्तावित एक्स्प्रेस वे 225 किमीचा असेल, ज्यामुळे पुणे आणि औरंगाबाद दरम्यानचा प्रवास वेळ सध्याच्या चार ते पाच तासांवरून अवघ्या दोन तासांवर येणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग ग्रीनफिल्ड कॉरिडॉर राहणार आहे.
या मार्गामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि प्रदेशातील आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नागपूर ते जालना समृद्धी महामार्ग आणि पुढे छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा जलद प्रवास सुलभ करून प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा आणण्यासाठी या एक्स्प्रेस वेचे बांधकाम तयार होत आहे. या महामार्गामुळे नागपूर ते पुणे हा प्रवास देखील गतिमान होणार आहे.