Pune New Highway : पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रकल्पांची कामे अजूनही सुरू आहेत.
खरे तर कोणत्याही प्रदेशाच्या, राज्याच्या आणि देशाच्या एकात्मिक विकासात तेथील रस्ते व्यवस्था अन रेल्वे व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. हेच कारण आहे की देशात सध्या स्थितीला रस्ते अन रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
प्रामुख्याने रस्ते मार्ग चकाचक बनवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
एवढेच नाही तर आता पुण्यातून कोकणात जाणे सोपे व्हावे यासाठी एका नवीन हायवेचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीची देखील तरतूद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात एक नवीन रस्ता तयार होणार आहे.
या नवीन हायवेमुळे कोकणात जाण्यासाठी पुणे जिल्ह्यातील नागरिकांना तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामुळे पुणे ते कोकण हा प्रवास जलद आणि सुरक्षित होईल असे अशा व्यक्त होत आहे.
या नवीन हायवेमुळे पुणे शहरातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा या दोघांची बचत होण्याची शक्यता आहे.
कसा असेल रूट ?
मिळालेल्या माहितीनुसार पुणे आणि रायगड जिल्हा एकमेकांना नवीन हायवेने जोडला जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या भोर्डे ते रायगड जिल्ह्यातील महाड येथील शेवते घाट दरम्यान नवीन हायवे तयार होणार आहे.
यामुळे पुण्यातील नागरिकांना कोकणात जाण्यासाठी तिसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्यातील दोन राजधान्या या हायवेमुळे कनेक्ट होतील अशी आशा व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवातही झाली आहे. हा एकूण 13 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यासाठी 30 कोटी 32 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 25 कोटी 32 लाख रुपये आणि हिवाळी अधिवेशनातून या रस्त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. यामुळे या नव्या हायवेचे काम जलद होईल अशी आशा व्यक्त होत आहे.