Pune News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे शहराला लवकरच एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची भेट मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच पुणे दौऱ्यावर येत आहेत.
दोन मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा एकदा पुणे दौरा आयोजित करण्यात आला असल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन संपन्न होणार असे सुद्धा सांगितलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार अशा चर्चा आहेत. दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्घाटन करणार असे बोलले जात आहे.
परंतु या वृत्ताला पुणे विमानतळ प्रशासनाच्या माध्यमातून दुजोरा मिळालेला नाही. एकंदरीत खरंच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार का? किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनलचे उद्घाटन होणार का? याबाबत अधिकृत माहिती समोर येऊ शकलेले नाही.
मात्र, पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल चे काम पूर्ण झाले असल्याने हे नवीन टर्मिनल लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुले केले गेले पाहिजे अशीच भूमिका विमानतळ प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान नवीन टर्मिनल चे काम पूर्ण होऊनही याचे उद्घाटन होत नसल्याने विरोधकांच्या माध्यमातून या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरले जात आहे.
या मुद्द्यावर सध्या मोठ्या प्रमाणात राजकारण होत आहे. हेच कारण आहे की लवकरात लवकर पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल खुले व्हावे अशी प्रशासनाची इच्छा आहे.
विशेष म्हणजे नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाचा मुद्दा राज्यसभेत देखील मोठ्या प्रमाणात गाजला होता. यामुळे हे नवीन टर्मिनल लवकरात लवकर प्रवाशांसाठी खुले व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान या नवीन टर्मिनल बाबत बोलायचं झालं तर यामध्ये प्रवाशांच्या बॅगेज, लगेज चेक करण्यासाठी नवीन प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे. शिवाय येथे एक चांगले रेस्टॉरंट देखील राहणार आहे.
कार्बन फुट प्रिंट कमी करण्यासाठी येथे स्कायलाईटचा वापर करण्यात आला आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी येथे व्यवस्था राहणार आहे. प्रवाशांना आराम करण्यासाठी लाऊंज राहणार आहेत.