Pune News : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. या शहराला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. हे एक कॅपिटल शहर तर आहेच शिवाय या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ख्याती प्राप्त आहे.
या शहरात देशातील नामांकित शैक्षणिक संस्था पाहायला मिळतात. तसेच इथे राज्यातील आणि देशातील नामांकित कोचिंग सेंटर देखील आहेत. हे शहर स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले आहे.
अलीकडे या शहरात अनेक प्रतिष्ठित आयटी कंपन्यांनी देखील आपले बस्तान बसवले आहे. यामुळे या शहरात रोजाना शिक्षणानिमित्त आणि रोजगारा निमित्त हजारो नागरिक येत असतात. पर्यटनासाठी देखील रोजच या शहरात हजारोंच्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.
कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या शहरात खूपच अधिक आहे. या शहरात महाराष्ट्रासहित देशातील कानाकोपऱ्यातून नागरिक येतात. शहरात कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी आल्यानंतर सर्वप्रथम प्रश्न उभा राहतो तो तात्पुरत्या निवाऱ्याचा. यासाठी हॉटेल आणि रिसॉर्टचा विचार होतो.
खरंतर पुणे शहरात हजारोंच्या संख्येने हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत. अनेक हायफाय हॉटेल्स आणि रिसॉर्ट शहरात उपलब्ध आहेत. मात्र आज आपण सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या, बजेटमध्ये फिट बसणाऱ्यां, अगदी 700 ते 800 रुपयात रूम उपलब्ध होणाऱ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट बाबत जाणून घेणार आहोत.
आज आपण पुणे शहरातील टॉप 10 स्वस्त आणि खिशाला परवडणाऱ्या तसेच उत्कृष्ट सोई सुविधा पुरवणाऱ्या हॉटेल्स बाबत जाणून घेणार आहोत. पुणे शहरात जर कमी पैशात राहण्याची व्यवस्था करायची असेल तर या 10 हॉटेल्सपैकी कोणत्याही एका हॉटेलला आपण स्टे घेऊ शकता.
पुण्यातील स्वस्तात मस्त हॉटेल्स
आज आपण पुणे शहरातील स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या काही हॉटेलची आणि रिसॉर्टची यादी पाहणार आहोत. तुम्ही यातून तुमच्या बजेटला फिट होणारी हॉटेल निवडून पुण्यामध्ये स्टे करू शकता.
- नाना पेठ, लक्ष्मी रोड परिसरातील हॉटेल पराग
- संगमवाडी हॉटेल शिवकृपा
- धायरी हॉटेल अवधूत
- एरंडवणे हॉटेल कृष्णा प्रेसिडन्सी
- डेक्कन जीमखाना हॉटेल सपना
- चिंचवड हॉटेल सेलिब्रेशन इन
- पुणे गेस्ट हाऊस
- सोमवार पेठ होटेल राजमंदिर
- हॉटेल गौरव
- सिंहगड परिसरात हॉटेल जमजीर प्रेसिडन्सी
या दहा हॉटेल्समध्ये प्रत्येकाच्या खिशाला परवडणारे भाडे आहे. स्वस्तात रूम उपलब्ध आहेत शिवाय या हॉटेल्स मध्ये विविध सोयी सुविधा देखील पुरवल्या जात आहेत. पूर्णपणे सुरक्षित, स्वच्छ परिसर आणि विश्वासू स्टाफ हे या हॉटेलचे काही वैशिष्ट्ये आहे.
यात ग्राहकांना सोयीप्रमाणे एसी, नॉन एसी, सिंगल किंवा डबल बेडचा रूम मिळणार आहे. जास्त लोकांचा ग्रुप असेल तरीदेखील या हॉटेल्स मध्ये राहण्यासाठी उत्तम सुविधा पुरविल्या जातात. फिरण्यासाठी किंवा कामानिमित्त जाणाऱ्या लोकांसाठी या हॉटेल्स खूपच फायदेशीर ठरू शकतात.