Pune PMP Bus News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे शहरातील दोन महत्त्वाच्या मार्गावर पीएमपीची बससेवा सुरू झाली आहे. खरंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पीएमपीची बस सेवा सूरु आहे. पीएमपीच्या बससेवेमुळे पुण्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असून त्यांचा प्रवास जलद झाला आहे.
यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बळकट होत आहे. दरम्यान, पीएमपी कडून आता पुण्यातील दोन महत्त्वाच्या मार्गावर बस सेवा चालवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी अर्थातच काल 22 सप्टेंबर 2023 रोजी हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक आणि मुंढवा चौक ते केसनंद फाटा या दोन नव्या मार्गांवर पीएमपी ची बस सेवा सुरू झाली आहे.
या बससेवेमुळे या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या भागातील नागरिकांचा प्रवास यामुळे गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान या मार्गावरील प्रवाशांनी पीएमपीच्या या निर्णयाचे तोंड करून स्वागत केले आहे. पीएमपीच्या वाहतूक विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
पीएमपीच्या वाहतूक विभागाने सांगितल्याप्रमाणे, रेल्वेच्या प्रवाशांसाठी हे दोन मार्ग सुरू करण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही मार्गांवर आठवड्यातील रविवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी सेवा पुरवली जाणार असल्याचे देखील वाहतूक विभागाच्या माध्यमातून यावेळेस स्पष्ट करण्यात आले आहे.
कसे आहेत मार्ग
पीएमपीकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हडपसर गाडीतळ ते हडपसर रेल्वे स्थानक दरम्यान चालवली जाणारी गाडी मगरपट्टा, मुंढवा गाव, मुंढवा चौक, लोणकर काॅलनी या मार्गात धावणार आहे.
विशेष म्हणजे या मार्गावरील गाडी रेल्वेच्या वेळेनुसार चालवली जात असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय मुंडवा चौक ते केसनंद फाटा या दरम्यानच्या गाडीचा माळवाडी मांजरी, आव्हाळवाडी, सातव पार्क, वाघोली बाजार असा मार्ग राहणार आहे. या मार्गावर दर एक तासाने गाडी चालवली जात आहे.