Pune Railway News : गेल्या दहा वर्षांच्या काळात देशातील रस्ते आणि रेल्वे वाहतुक सक्षम बनवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न झाले आहेत. गेल्या एका दशकात देशातील विविध भागांमध्ये अनेक रस्ते मार्ग, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे मार्ग, रेल्वे ब्रिज, रेल्वे स्थानक अशी कामे पूर्ण झाली आहेत. पण असेही काही कामे आहेत जें की अजूनही फक्त कागदावरच आहेत.

प्रत्यक्षात अशा प्रस्तावित प्रकल्पांचे काम सुरू होऊ शकलेले नाही. यामुळे सरकारवर टीका देखील होत आहे. असेच एक काम आहे पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाचे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील दोन महत्त्वाची शहरे आहेत.

Advertisement

पण आजही या दोन शहरांदरम्यान रेल्वे मार्ग विकसित झालेला नाही. परिणामी पुणे ते नाशिक आणि नाशिक ते पुणे असा प्रवास खूपच आव्हानात्मक होत आहे. यामुळे ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने कनेक्ट करण्यासाठी 235 किलोमीटर लांबीचा सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.

मात्र गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प मंजुरी विना अडकून पडला आहे. हा प्रकल्प केंद्राच्या मंजुरी विना फाईलबंद आहे. दरम्यान हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

Advertisement

वाजे यांच्या पाठपुराव्यानंतर आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील या प्रकल्पासाठी मैदानात उतरले आहेत. भुसे यांनी या प्रकल्पाला लवकरात लवकर केंद्रीय मंत्रिमंडळाचे मंजुरी मिळावी यासाठी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे.

त्यांनी या प्रकल्पासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवले आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आणि पालकमंत्र्यांच्या या पाठपुराव्यानंतर आता या प्रकल्पावर केंद्राकडून काय निर्णय घेतला जातो हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

Advertisement

रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे काय फायदा होणार

सध्या नाशिक ते पुणे दरम्यानचा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना रस्ते मार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. रस्ते मार्गाने हा प्रवास करायचा झाल्यास जवळपास सहा तासांचा वेळ लागतो. परंतु नाशिक ते पुणे दरम्यान रेल्वे मार्ग विकसित झाला तर प्रवासाचा हा कालावधी चार तासांनी कमी होणार आहे.

Advertisement

रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे हा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होऊ शकतो. या रेल्वेमार्ग प्रकल्पावर 20 रेल्वे स्टेशन विकसित होणार आहेत. यामुळे नाशिक आणि पुण्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *