Pune Railway News : सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे, एसटी महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे रेल्वे आणि एसटी महामंडळाकडून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. उन्हाळी सुट्ट्या आणि लोकसभा निवडणुकीचा काळ पाहता अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत आहेत.
पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या मूळ गावाकडे प्रस्थान करत आहेत. हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाने पुण्याहून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अनेक शहरांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आले आहेत.
अशातच आता पुणे ते भुवनेश्वर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या रेल्वे मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहायला मिळत असल्याने या मार्गावर ही सुपरफास्ट उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या विषयी माहिती पाहणार आहोत.
कसे असणार वेळापत्रक
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-भुवनेश्वर सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 01451) ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून येत्या दोन दिवसांनी अर्थातच 18 मे 2024 ला सकाळी साडेअकरा वाजता सुटणार आहे आणि ही गाडी तिसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता भुवनेश्वर ला पोहोचणार आहे.
कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, भाटापारा, बिलासपूर, चंपा, शक्ती, रायगड, झारसुगुडा, राउरकेला, चकरधरपूर, टाटानगर, हिजली, बालेश्वर, भद्रक, जाजपुर के रोड आणि कटक या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.