Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येत आहे. ही अपडेट पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक महत्त्वाची आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासनाने पुण्यातून धावणाऱ्या दोन एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
खरे तर, भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने आणि रेल्वेचे नेटवर्क देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे म्हटल्यास सर्वप्रथम रेल्वेलाच प्राधान्य दिले जाते.
रेल्वे देखील आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळे निर्णय घेत असते. नुकताच असाच एक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
प्रशासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार, पुणे-हरंगुळ-पुणे गाडीला आणि पुणे-मिरज -पुणे या एक्सप्रेस ट्रेनला अतिरिक्त थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या स्थानकावर मिळाला थांबा ?
खरंतर येत्या काही दिवसात होळी आणि धुलिवंदनाचा सण येणार आहे. या सणासाठी पुण्यातून मोठया प्रमाणात नागरिक आपल्या गावाकडे परतणार आहेत.
अशातच, या सणासुदीच्या दिवसात रेल्वे प्रशासनाने पुणे-हरंगुळ-पुणे या एक्सप्रेस ट्रेनला या मार्गावरील पारेवाडी स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तसेच पुणे-मिरज -पुणे एक्स्प्रेस गाडीला किर्लोस्करवाडी या स्थानकावर प्रायोगिक थांबा मंजूर करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
हे दोन्ही निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी घेण्यात आले असून आगामी सणासुदीच्या दिवसांमध्ये या निर्णयाचा या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
कधीपासून होणार अंमलबजावणी ?
पुणे-हरंगुळ-पुणे या एक्सप्रेस ट्रेनला पारेवाडी या स्थानकावर प्रायोगिक थांबा मंजूर करण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारपासून अर्थातच 14 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे.
त्यामुळे, या गाडीने प्रवास करणाऱ्या पारेवाडी व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळतं आहे. याशिवाय, पुणे-मिरज-पुणे एक्सप्रेस गाडीला किर्लोस्करवाडी या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर झाला असून या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून अर्थातच 19 मार्च 2024 पासून होणार आहे.