Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्याची संख्या खूप अधिक आहे. रेल्वेत किफायतशीर दरात जलद आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने रेल्वेच्या प्रवासाला कायमच प्रवाशांनी पसंती दाखवली आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांसाठी विविध सोयीसुविधा देखील पुरवल्या जात आहेत.
अशातच आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता रेल्वे प्रवाशांना दर्जेदार, परवडणारे आणि आरोग्यदायी जेवण देण्यासाठी एक अतिशय कौतुकास्पद अशी योजना रेल्वे राबवत आहे.
भारतीय रेल्वेने इकॉनॉमी मिल ही संकल्पना राबवण्यास सुरवात केली आहे. या अंतर्गत आता प्रवाशांना केवळ 20 रुपयात जेवण मिळणार आहे. जन थाळी म्हणून प्रवाशांना 20 रुपये आणि 50 रुपयात जेवण मिळणार आहे. खरतर, रेल्वेच्या प्रवासात प्रवाशांना अनेकदा चांगल जेवण मिळत नाही. शिवाय काही ठिकाणी चांगले जेवण मिळते पण जेवण खूप महागडे असते.
यामुळे सर्वसामान्यांना प्रवासात मोठ्या अडचणी सोसाव्या लागतात. मात्र आता जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्यांना किफायतशीर दरात जेवण दिले जात असून, पुणे रेल्वे स्टेशनवर याची सुरुवात झाली आहे. प्लॅटफॉर्मवर जनरल बोगीजवळ सेवा काउंटरद्वारे हे जेवण दिले जात आहे. निश्चितच रेल्वेचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
जेवण काय-काय मिळणार ?
मिळालेल्या माहितीनुसार, 20 रुपयांच्या जेवणामध्ये 7 पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (अन्य सिझनेबल भाजी) दिली जाणार आहे. तसेच 50 रुपयांच्या ‘कॉम्बो मिलमध्ये दही भात, दाल खिचडी व अन्य भाताचे प्रकार दिले जाणार आहेत.
पुणे विभागात कुठे-कुठे मिळणार जेवण ?
पुणे रेल्वे विभागात देखील काही रेल्वे स्थानकावंर ही सुविधा दिली जाणार आहे. आयआरसीटीतर्फे पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकात आता 20 रुपयात आणि 50 रुपयात ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. जनरल बोगीतुन प्रवास करणाऱ्या प्रवाशाना याचा फायदा होत आहेत.