Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा असतो. शिवाय भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. अर्थातच देशातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात जायचे असेल तर रेल्वे उपलब्ध होते.
यामुळे रेल्वेच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती मिळते. विशेष म्हणजे रेल्वे देखील आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच वेगवेगळे निर्णय घेत असते. प्रवाशांचा प्रवास जलद आणि आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे कडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.
याच उपाययोजनांचा एक भाग म्हणून सणासुदीच्या काळात तसेच गर्दीच्या काळात भारतीय रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवल्या जात आहेत. मध्य रेल्वेने नुकत्याच काही दिवसांपूर्वी अशीच एक विशेष एक्सप्रेस ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
यानुसार पुणे ते जबलपूर दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवली जात आहे. दरम्यान याच विशेष साप्ताहिक ट्रेन संदर्भात मध्य रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
या ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला असून या निर्णयामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
दरम्यान आता आपण या ट्रेनला मुदतवाढ दिल्यानंतर ही गाडी कोणत्या तारखेपर्यंत सुरू राहणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती दिवस मुदतवाढ मिळाली
मध्य रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष ट्रेन 1 एप्रिल 2024 पर्यंत चालवण्याचा निर्णय झालेला होता. मात्र या ट्रेनमधील प्रवाशांची गर्दी पाहता आता या ट्रेनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यानुसार पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष ट्रेन एक जुलै 2024 पर्यंत धावणार आहे.
ही ट्रेन दर सोमवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सध्याच्या वेळापत्रकानुसार सुटणार आहे. दुसरीकडे, जबलपूर-पुणे विशेष ट्रेन जी सुरुवातीला 31 मार्च 2024 पर्यंत दर रविवारी धावणार होती, ती आता 30 जून 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ मिळाली असली तरी देखील त्याचे थांबे, वेळ आणि रचना अपरिवर्तित राहणार आहे.
याचे आरक्षण 15 मार्च 2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उपलब्ध असेल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.