Pune Railway News : पुण्यातील सर्वसामान्य जनतेसाठी एक अतिशय महत्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. नववर्षाच्यापूर्वीच पुणेकरांना रेल्वेने एक मोठी भेट दिली आहे.
खरे तर देशातील सर्वसामान्य नागरिक प्रवासासाठी रेल्वेला सर्वात जास्त महत्त्व देतात. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असतो शिवाय रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहे.
अशा परिस्थितीत रेल्वेने देशात कोणत्याही भागात प्रवास करायचा असेल तरीदेखील शक्य आहे. लांब पल्ल्याचा प्रवास देखील रेल्वेमध्ये कमी पैशात आणि अतिशय आरामाने पूर्ण केला जाऊ शकतो.
हेच कारण आहे की या प्रवासाला देशात सर्वात जास्त पसंती मिळते. दरम्यान, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पुणे ते कोल्हापूर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय सल्लागार समितीच्या बैठकीत बुधवारी अर्थातच 20 डिसेंबर 2023 रोजी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिक्षणाचे माहेरघर अन देशातील एक प्रमुख आयटी हब म्हणून ओळख प्राप्त पुण्यात कोल्हापूर येथून रोजाना हजारो नागरिक येत असतात.
यासोबतच कोल्हापूर येथील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत दाखल होत असतात. अशा परिस्थितीत या मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये नेहमीच अधिकची गर्दी पाहायला मिळते.
हेच कारण आहे की, या मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय मध्ये रेल्वेने घेतला होता. पुणे ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकापर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार होती.
मात्र आता या ट्रेनला मुदतवाढ मिळाली असून 31 मार्च 2024 पर्यंत ही गाडी सुरू ठेवली जाणार आहे. सोबतच सध्या अमृत भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर रेल्वे स्थानकात विविध विकास कामे केली जात आहेत.
यामुळे तेथे स्वच्छतागृह बंद झाली आहेत. परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता तेथे चार फिरते स्वच्छतागृह बसवण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.