Pune Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला विशेष प्राधान्य दाखवले जाते. रेल्वेने एका शहरातून दुसऱ्या शहरात सहजतेने पोहोचता येते.
मात्र सध्या स्थितीला उन्हाळीची सुट्टी सुरू असल्याने आणि सणासुदीचा हंगाम असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होतेय ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. यामुळे अनेकांना रेल्वे गाड्यांमध्ये तिकीट मिळत नाही.
रेल्वे गाड्यांचे आरक्षण ताबडतोब फुल होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना वेटिंगवर थांबावे लागत आहे. दरम्यान या अशा परिस्थितीतच पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे पुण्यासाठी काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाड्या थेट बिहार मधून चालवल्या जाणार आहेत.
पुणे हे एक प्रमुख आयटी हब आहे. पुण्यात नोकरीच्या निमित्ताने आणि शिक्षणाच्या निमित्ताने बिहार मधील देखील मोठी जनता वास्तव्याला आहे.
याच बिहार मधील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाने जयनगर ते पुणे आणि दानापुर ते पुणे या विशेष गाड्या चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान आता आपण या विशेष गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार जयनगर-पुणे वनवे विशेष गाडीचे वेळापत्रक
जयनगर-पुणे ही 055529 या रेल्वे क्रमांकाची विशेष वन वे गाडी 5 एप्रिलला जयगनर येथून संध्याकाळी 5 वाजता सुटणार आहे. तसेच ही गाडी 7 एप्रिल ला पाच वाजून 35 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर येणार आहे.
या गाडीला या रेल्वे मार्गावरील दरभंगा, मुझफ्फरपूर, हाजीपूर, पाटीलपूत्र, आरा, बक्सर, पंडीत दीनदयाल उपाध्याय जंक्शनसह विविध स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे. या ट्रेनमध्ये स्लीपर क्लास चे 20 कोच राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे.
कसं राहणार दानापूर-पुणे वनवे स्पेशल ट्रेन चे वेळापत्रक
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे क्रमांक 03265 ही गाडी दानापूर येथून 4 एप्रिलला रात्री 21.40 वाजता निघणार आहे. तसेच ही गाडी सहा एप्रिलला सकाळी साडेचार वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीला स्लीपर क्लासचे 20 कोच राहणार असून ही गाडी या रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला आरा, बक्सर, पंडीत दीन दयाल उपाध्याय जंक्शनसह अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे.