Pune Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकापर्यंत धावणारी एक एक्सप्रेस ट्रेन आता थेट सांगली जिल्ह्यातील मिरज रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे. यामुळे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून याचा फायदा पुण्यातील रेल्वे प्रवाशांना देखील होणार आहे.
या गाडीच्या विस्तारामुळे पुणे ते मिरज दरम्यानचा प्रवास देखील सोयीचा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की रेल्वे प्रशासनाने बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार थेट मिरज पर्यंत केला आहे.
अर्थातच आता बिकानेर ते पुणे एक्सप्रेस ट्रेन मिरज जंक्शन पर्यंत धावणार आहे. रेल्वे विभागाने नुकतीच याला मंजुरी दिली असून यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मात्र ही गाडी सांगली आणि किर्लोस्करवाडीला थांबणार नाही हे विशेष. यामुळे या गाडीचा विस्तार झाला असला तरी देखील प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.
ही गाडी सांगली आणि किर्लोस्करवाडीला सुद्धा थांबली पाहिजे अशी प्रवाशांची मागणी आहे. मात्र प्रवाशांची ही मागणी सध्या तरी पूर्ण झालेली नाही. भविष्यात मात्र प्रवाशांच्या या मागणीवर रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो अशी आशा आहे.
सध्या स्थितीला रेल्वे बोर्डाकडून बिकानेर ते पुणे एक्स्प्रेसला मिरज रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करण्याला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचे आदेश रेल्वे बोर्डचे संचालक संजय नीलम यांच्या माध्यमातून जारी करण्यात आले आहेत.
बिकानेर ते पुणे ही एक साप्ताहिक एक्स्प्रेस आहे. ही गाडी सोमवार व मंगळवारला धावते. रेल्वे बोर्डाने सांगितल्याप्रमाणे, पुणे ते मिरजदरम्यान या एक्स्प्रेसला कऱ्हाड, सातारा व लोणंद या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.