Pune Railway News : गेल्या महिन्यापासून संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात देशात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळाली. या महिन्यात आता नवरात्र उत्सवाची धूम राहणार आहे. नवरात्र उत्सवाचा पावन पर्व संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणार आहे.
याशिवाय विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण देखील साजरा केला जाणार आहे. विजयादशमी नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जाणार आहे. तसेच पुढील महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. अशा परिस्थितीत या सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे.
देशातील विविध रेल्वे मार्गांवर प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. यामध्ये पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे रेल्वे मार्गावर देखील प्रवाशांची वर्दळ वाढणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही शहरा दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.
खरतर नागपुरसह संपूर्ण विदर्भातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुणे शहरात शिक्षणासाठी येतात. कामानिमित्त पुण्यातच स्थायिक होणाऱ्यांची विदर्भवासियांची संख्या देखील अधिक आहे. यामुळे सणासुदीच्या काळात पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते.
दरम्यान हि वाढणारी प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वेने अजनी-पुणे आणि नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्सप्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही हमसफर एक्सप्रेसला प्रत्येकी पाच डबे जोडण्याचा निर्णय झाला आहे.
याआधी या संपूर्ण वातानुकूलित ट्रेनमध्ये 15 एल एच बी डब्बे होते. मात्र आता ही संख्या 20 वर पोहोचणार आहे. यामुळे या दोन्ही ट्रेनमध्ये प्रत्येकी 360 प्रवासी अधिकचे बसणार आहेत. यामुळे नागपूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
निश्चितच विजयादशमी आणि दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय या मार्गावरील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. यामुळे वेटिंग लिस्ट वरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.