Pune Railway News : सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमान 40°c पार गेले आहे. पुण्यात देखील तापमान नवीन विक्रम स्थापित करत आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे, उकाड्यामुळे हैराण जनतेसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे.
खरंतर उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की नेहमीच रेल्वे प्रवाशांची संख्या वाढत असते. यंदा देखील उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्याने रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी नमूद केली जात आहे. अनेक जण आता आपल्या मूळ गावी जात आहेत.
दरम्यान याच अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे रेल्वे प्रशासन सांस्कृतिक राजधानी पुणे ते उपराजधानी नागपूर या दरम्यान एक्सप्रेस ट्रेन चालवणार असून ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवली जाणार आहे.
खरे तर, या गाडीची जेव्हा घोषणा झाली तेव्हा रेल्वे प्रशासनाने ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाईल असे म्हटले होते. मात्र नंतर आपला हा निर्णय बदलत रेल्वेने या गाडीला आठवड्यातून तीन दिवस चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
यामुळे या निर्णयाचा पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याची आशा व्यक्त होऊ लागली आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच, या गाडीचे तिकीट दर आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याविषयी देखील आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-पुणे उन्हाळी विशेष गाडी (ट्रेन क्र. 01165) 18 एप्रिल ते 13 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. ही विशेष गाडी या कालावधीत दर सोमवार, गुरुवार अन शनिवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
तसेच पुणे-नागपूर उन्हाळी विशेष गाडी (गाडी क्र. 01166) 19 एप्रिल ते 14 जून 2024 या कालावधीत चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी आठवड्यातून तीन दिवस दर मंगळवार, शुक्रवार अन रविवारी धावणार आहे. ट्रेन क्रमांक 01165 आणि ट्रेन क्रमांक 01166 या दोन्ही विशेष गाड्यांच्या प्रत्येकी नऊ फेऱ्या अशा एकूण 18 फेऱ्या होणार आहेत.
थांबे कोणते आहेत ?
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे पुणे ते नागपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड व उरली या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.
तिकीट दर किती राहणार
मिळालेल्या माहितीनुसार, या समर स्पेशल ट्रेनने नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोचंचे 1700 ते 1800 रू तिकीट काढावे लागणार आहे. या सोबतच तृतीय श्रेणी वातानुकूलितचे तिकीट दर हे 1300 ते 1400 रू असे राहणार आहे. सामान्य द्वितीय श्रेणीचे तिकीट दर हे 600 ते 700 रू राहणार अशी माहिती समोर आली आहे.