Pune Railway : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तसेच हे राज्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आणि आयटी हब आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी आपले बस्तान बसवले आहे.
पुण्यात देशातील नामांकित कॉलेजेस आणि विद्यापीठ स्थित आहेत. यामुळे या शहरात शिक्षणासाठी लाखो विद्यार्थी दाखल होत असतात. शिवाय पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या देखील मोठी आहे.
तसेच अलीकडे नामांकित आयटी कंपन्यांनी पुण्यात आपले कामकाज वाढवले असल्याने या शहरात कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. अशा स्थितीत पुणे शहरात ये-जा करण्यासाठी रेल्वे हे एक महत्त्वाचे साधन आहे.
दरम्यान पुण्यात रेल्वेने ये-जा करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी जळगावसह संपूर्ण खानदेशसाठी महत्त्वाची राहणार आहे.
रोजाना जळगाव जिल्ह्यातून हजारो नागरिक पुण्याकडे जातात. जळगाव जिल्ह्यातून पुण्याला जाण्यासाठी विविध एक्सप्रेस गाड्या देखील उपलब्ध आहेत. मात्र हा मार्ग खूपच वर्दळीचा असल्याने सध्या सुरू असलेल्या गाड्या देखील अपुऱ्या पडत आहेत.
अशा परिस्थितीमध्येच गेल्या काही महिन्यांपूर्वी रेल्वेने भुसावळ ते पुणे दरम्यान धावणारी हुतात्मा एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.
अशा स्थितीत ही गाडी पुन्हा एकदा सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून केली जात आहे. दरम्यान या मागणीला आता यश मिळणार असल्याचे चित्र आहे. कारण की, रेल्वे राज्यमंत्री यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी भुसावल ते पुणे दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली आहे.
मात्र, ही नव्याने सुरू होणारी गाडी नवीन मार्गावरून धावणार आहे. म्हणजे आधीची भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन ज्या मार्गाने धावत होती त्या मार्गे ही नव्याने सुरू होणारी गाडी धावणार नाही. ही गाडी नंदुरबार, उधना, वसई मार्गाने चालवली जाणार अशी माहिती समोर आली आहे.
एकंदरीत ही गाडी मोठा वळसा घालून जाणार आहे. यामुळे या गाडीवरून भुसावळवरून थेट पुण्याला जाणारे लोक प्रवास करणार नाहीत असे सांगितले जात आहे.
पण वेस्टर्न लाईनवर प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा फायदा होणार आहे. दरम्यान ही नव्याने सुरू केली जाणारी गाडी दौंड आणि मनमाड मार्गे धावणारी असावी अशी मागणी रेल्वे प्रवाशांनी यावेळी केली आहे.