Pune Real Estate News : पुणे ही राज्याची सांस्कृतिक राजधानी. या शहराला शिक्षणाचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. शिवाय अलीकडे पुण्यात मोठ मोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
यामुळे शिक्षणानिमित्त, रोजगारानिमित्त, व्यवसायानिमित्त पुण्यात येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जो कोणी पुण्यात व्यवसाय निमित्त किंवा कामानिमित्त येतो तो पुण्यातच स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत असतो.
पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण वास्तव्यासाठी खूपच पोषक आहेत. संपूर्ण जिल्ह्यात सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगत असणारे परिसर देखील वेगाने विकसित होत आहेत. यामुळे येथे निवासी मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
विशेष म्हणजे पुण्यात आगामी काळात निवासी मालमत्तेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या आणखी वाढणार आहे. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घर खरेदीचा देखील आलेख वाढत चालला आहे. पुण्यात घर खरेदीने आताच एक नवीन विक्रम नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये 17,570 घरांचे खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. पुणे जिल्ह्याने हा एक नवीन विक्रम घर खरेदीचा हा एक नवीन विक्रम केला आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याशी तुलना केली असता यामध्ये 23 टक्क्यांची मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे. अर्थातच पुणे जिल्ह्यात घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नाईट फ्रॅंक इंडिया या संस्थेने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील घर खरेदीचा डाटा जारी केला आहे. यामध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान आता आपण पुणेकरांनी कोणते घर खरेदीला अधिक प्राधान्य दाखवले आहे हे थोडक्यात समजून घेणारा आहोत.
कोणत्या घरांना मिळाली सर्वाधिक पसंती ?
सदर अहवालानुसार, पुणेकरांनी 50 लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपये किंमत असलेल्या घरांना सर्वाधिक पसंती दाखवली आहे. जिल्ह्यात झालेल्या एकूण घर खरेदीत 50 लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या घराचा वाटा 32 टक्के एवढा राहिला आहे.
25 ते 50 लाख रुपये किंमत असलेल्या घरांचा वाटा तीस टक्के एवढा राहिला आहे. तसेच 25 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या घरांचा यामध्ये 22 टक्के एवढा वाटा आहे. विशेष म्हणजे एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या घरांचा यामध्ये 14 टक्के एवढा वाटा राहिला आहे.
अर्थातच 50 लाख रुपयांपेक्षा अधिकच्या घर खरेदीला पुणेकरांनी जास्तीची पसंती दाखवली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर 500 ते 800 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या घरांची जास्त विक्री झाली आहे. तसेच 500 चौरस फूट पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.