Pune Ring Road Latest News : पुणे रिंग रोड हा महाराष्ट्र राज्य शासनाचा एक महत्वाची प्रकल्प आहे. यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून या प्रकल्पाचे जलद गतीने काम व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील वाहतूक कोंडी फोडणार आहे.
एवढेच नाही तर यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील कृषी, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला हातभार लावणारा ठरेल अशी आशा आहे. दरम्यान याच प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
ही बातमी समोर येतेय जिल्हाधिकारी कार्यालयातून. खरे तर या प्रकल्पाचे जलद गतीने भूसंपादन झाले पाहिजे आणि लवकरात लवकर याचे काम सुरू झाले पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे. सध्या स्थितीला या प्रकल्पाचे पश्चिम भागातील भूसंपादन अंतिम टप्प्यात आले आहे.
पश्चिम भागातील भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून या भागातील बाधित जमिनी धारकांना मोबदला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने नुकतीच एक हजार कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. दुसरीकडे पूर्व भागातील भूसंपादन देखील आता जलद गतीने पूर्ण होणार आहे.
कारण की जिल्हा प्रशासनाने पूर्व भागातील सहा गावांमधील जमिनीचे दर अंतिम केले आहेत. जसं की आपणास ठाऊकच आहे की पूर्व भागातील रिंग रोडमध्ये जिल्ह्यातील 46 गावे बाधित होणार आहेत. मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांमधील ही 46 गावे राहणार आहे.
दरम्यान यापैकी मावळ तालुक्यातील गावांबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. मावळ तालुक्यातील वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी, माणोलीतर्फ चाकण या सहा गावांमधील 73.31 हेक्टर जमिनीसाठी चा मोबदला अंतिम करण्यात आला आहे. यासाठी 883 कोटी 55 लाख रुपयांचा मोबदला अंतिम झाला आहे.
आता मोबदला निश्चित झाला असल्याने संबंधितांना भूसंपादनाची नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस बजावल्यानंतर जे शेतकरी बांधव मुदतीत संमती पत्र सादर करतील म्हणजेच मुदतीत जमीन देण्यास संमती दाखवतील त्यांना 25% अतिरिक्त मोबदला या ठिकाणी देऊ केला जाणार आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने वडगाव, कातवी आणि वराळे या गावातून राष्ट्रीय महामार्गाचा प्रस्तावित पुणे ते छ. संभाजीनगर ग्रीन कॉरिडॉर जाणार असल्याने ही गावे प्रभाव क्षेत्रात आली असल्याने मोबदल्यात वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून दर निश्चित केले असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
तर आंबी, आकुर्डी माणोली या तीन गावातील जमिनी ग्रामीण भागात असल्याने नगर विकास विभागाने मूल्यांकन केल्यानुसार जुने व्यवहार पडताळणी करून भूसंपादनाचे दर निश्चित केलेले आहेत.
एकंदरीत पूर्व भागातील रिंग रोड साठी जमिनीचे दर अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.