पुणे रिंग रोडचे काम होतंय सुसाट ! पश्चिम भागातील भूसंपादनाचे काम पूर्ण, ‘या’ 31 गावांसाठी तीन हजार कोटी रुपयांचा निधी, पहा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा गौरव केला जातो. मात्र असे असले तरी या सांस्कृतिक राजधानीत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे.

172 किलोमीटर लांबीच्या आणि 110 मीटर रुंदीच्या या रिंग रोड मुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा आशावाद जाणकारांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याच रिंग रोड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

खरेतरे या मार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. याचे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले आहे. दरम्यान पश्चिम रिंग रोडचे भूसंपादनाचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे.

पश्चिम भागातील 34 पैकी 31 गावांमध्ये भूसंपादन पूर्ण झाले असून संबंधितांना 2975 कोटी रुपयांचा मोबदला या ठिकाणी वितरित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पश्चिम भागातील भोर तालुक्यातील पाच गावे भूसंपादनातून वगळली गेली आहेत.

कारण की, या गावातून पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे कांजळे, कोळवडे, खोपी, कांबरे आणि नायगाव या गावातील तीन गावांमध्ये या रस्त्यासाठी भूसंपादन होणार नाही.

मात्र शिवरे गावाचा यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील जमिनीचे दर ठरवले जाणार आहेत. यानुसार प्रक्रिया देखील सुरू आहे.

जेव्हा पूर्वेकडील गावामध्ये भूसंपादन होईल तेव्हा या गावाचा त्यामध्ये समावेश केला जाणार आहे. दुसरीकडे पूर्व रिंग रोड बाबत बोलायचं झालं तर या विभागातील मावळ मधील 11, खेड मधील बारा, हवेली येथील 15, पुरंदर येथील पाच आणि भोर मधील तीन गावांमधून हा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला आहे.

यानुसार या ठिकाणी भूसंपादनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. बाधित शेतकऱ्यांना भू संपादनाच्या नोटिसा बजावल्या गेल्या आहेत.

विशेष म्हणजे खेड मधील स्वयंघोषणापत्र घेण्यास दिलेली मुदत वाढ आता संपत आली असल्याने स्वयंघोषणापत्र घेण्यास सुरुवातही झाली आहे. मावळ आणि हवेली तालुक्यात तातडीने भूसंपादन करण्यासाठी संबंधितांना आदेश देखील देण्यात आले आहेत.

यामुळे पुणे रिंग रोडचे पूर्व आणि पश्चिम भागातील भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी आशा आहे.

Leave a Comment