Pune Solapur Railway News : राज्यासहित संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे हा प्रवास खिशाला परवडणारा आहे. दुसरे कारण म्हणजे रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तरी देखील रेल्वे सहजतेने उपलब्ध होते.
स्वस्त, सुरक्षित आणि जलद प्रवास म्हणून रेल्वे कडे पाहिले जाते. दरम्यान पुणे आणि सोलापूर येथील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावरील अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आले आहेत.
सोलापूर विभागातील दौंड येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 27 जुलै ते 1 ऑगस्ट यादरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग ची कामे केली जाणार असून या कालावधीत ब्लॉक राहणार आहे.
यामुळे जवळपास 18 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या मिरज मार्गे वळवल्या जाणार आहेत. तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहेत.
परिणामी सोलापूर-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत होणार असून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या ब्लॉकमुळे नेमक्या कोणकोणत्या रेल्वे गाड्या रद्द राहणार आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
रद्द झालेल्या एक्सप्रेस गाड्या खालील प्रमाणे
नांदेड-पनवेल एक्स्प्रेस
पनवेल – नांदेड एक्स्प्रेस
पुणे – सिकंदराबाद एक्स्प्रेस
सिकंदराबाद – पुणे एक्स्प्रेस
पुणे – सोलापूर एक्स्प्रेस
सोलापूर – पुणे एक्स्प्रेस (12270)
पुणे – सोलापूर (11417)
सोलापूर – पुणे (11418)
सोलापूर – दौंड डेमू
दौंड-सोलापूर डेमू
पुणे – हरंगुळ एक्स्प्रेस
हरंगुळ – पुणे एक्स्प्रेस
सोलापूर – पुणे डेमू (14222)
पुणे – सोलापूर डेमू (11421)
सिकंदराबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस
लोकमान्य टिळक टर्मिनस-सिकंदराबाद एक्स्प्रेस
पुणे – अमरावती एक्स्प्रेस
अमरावती – पुणे एक्स्प्रेस