Pune Vande Bharat Train : पुणेकरांसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे. कारण की, या नव्या वर्षात पुणेकरांना नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
खरेतर मागील 2023 हे वर्ष देखील पुणेकरांसाठी विशेष आनंदाचे ठरले होते. गेल्या वर्षी देखील पुणेकरांना वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली होती.
पुण्यातून धावणारी ही पहिली वंदे भारत ठरली होती. मुंबई ते सोलापूर दरम्यान सुरू झालेली ही गाडी पुणे मार्गे चालवली जात आहे.
मात्र अजूनही थेट पुणे रेल्वे स्थानकावरून एकही वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नाहीये. यामुळे राज्याच्या सांस्कृतिक राजधानी वरून थेट वंदे भारत ट्रेन सुरू झाली पाहिजे अशी इच्छा पुणेकरांनी बोलून दाखवली आहे.
मात्र पुणेकरांची ही इच्छा या नव्या वर्षात पूर्ण होणार आहे. Pune रेल्वे स्टेशन वरून ही गाडी लवकरच सुरू होणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रात किती गाड्या धावत आहेत
सध्या स्थितीला राज्यात सात वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, मुंबई ते मडगाव, मुंबई ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर, आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
यापैकी मुंबई ते जालना ही गाडी 30 डिसेंबर 2023 ला सुरू झालेली आहे. दरम्यान आता पुण्याला नवीन एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे.
कोणत्या मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस
हाती आलेल्या माहितीनुसार ही नवीन गाडी पुणे ते सिकंदराबाद या दरम्यान सुरू होणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही गाडी सुरू केली जाणार आहे.
सध्या या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. मात्र ही एक्सप्रेस बंद करून त्या ऐवजी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस दक्षिण मध्य रेल्वेचा आहे.