Punjab National Bank FD : एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे. अलीकडे भारतात एफडी म्हणजेच मुदत ठेव करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे कारण म्हणजे देशातील अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात चांगली वाढ केली आहे.
आरबीआयने रेपो रेट मध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी देखील एफडी व्याजदरामध्ये वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांना आता एफडीतून चांगला परतावा मिळू लागला आहे.
यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीसाठी आता एफडीकडे आकर्षित होऊ लागले आहेत. दरम्यान जर तुम्हीही एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण पंजाब नॅशनल बँकेत चारशे दिवसांसाठी तीन लाख रुपयांची एफडी केली तर किती रुपये रिटर्न म्हणून मिळणार याविषयी जाणून घेणार आहोत.
खरे तर अनेकांच्या माध्यमातून पंजाब नॅशनल बँकेत एफडी करण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. यामुळे आज आपण पंजाब नॅशनल बँकेच्या चारशे दिवसांच्या एफडी बाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेने सांगितल्याप्रमाणे, बँकेच्या माध्यमातून चारशे दिवसांच्या एफडी साठी 7.25% व्याजदराने व्याज पुरवले जात आहे. विशेष म्हणजे बँकेची ही सर्वात जास्त व्याज देणारी एफडी योजना.
म्हणजेच तुम्हाला जर पंजाब नॅशनल बँकेत एफडी करायची असेल तर तुम्ही चारशे दिवसांचीच एफडी केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला अधिक व्याजदराचा फायदा मिळू शकणार आहे.
जर तुम्ही या बँकेत चारशे दिवसांसाठी तीन लाख रुपयांची एफडी केली तर 7.25 टक्के व्याजदराने तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी म्हणजेच चारशे दिवसांनी तीन लाख 23 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे. यामध्ये तीन लाख रुपये तुमची गुंतवणूक राहणार आहे आणि 23 हजार रुपये तुमचे व्याज राहणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंजाब नॅशनल बँकेच्या या चारशे दिवसांच्या एफडीवर जेष्ठ नागरिकांना 0.50% अधिक व्याजदर दिले जाणार आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेत एफडी केल्यास त्यांना 7.75% व्याजदराने रिटर्न मिळणार आहेत.
निश्चितच ज्येष्ठ नागरिकांसाठी पंजाब नॅशनल बँकेची ही एफ डी योजना खूपच फायदेशीर ठरणार असून यामुळे त्यांना बंपर परतावा या ठिकाणी मिळू शकणार आहे. विशेषतः सुरक्षित गुंतवणूक ज्यांना करायची असेल त्यांच्यासाठी ही FD योजना फायद्याचा सौदा ठरणार आहे.