Punjab National Bank Home Loan Details : तुम्ही होम लोन घेण्याचा तयारीत आहात का ? मग कर्ज घेण्याआधी आजची ही बातमी संपूर्ण वाचा. विशेषता ज्यांना पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.
अलीकडे घरांच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत की, सर्वसामान्यांना आता घर खरेदीसाठी गृह कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे. गृहकर्जामुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे.
विशेष म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रातील जाणकार लोक आता सर्वसामान्य नागरिकांना गृह खरेदीसाठी गृह कर्ज घेण्याचा सल्ला सुद्धा देत आहेत. गृह कर्ज हे गुड लोन कॅटेगिरी मध्ये येते. यामुळे असे कर्ज सर्वसामान्यांना परवडते.
तथापि, गृह कर्ज घेण्यापूर्वी ग्राहकांनी कोणती बँक कमी व्याजदरात गृह कर्ज देत आहे याबाबत तपासणी केली पाहिजे. अशा परिस्थितीत, आज आपण पंजाब नॅशनल बँक होम लोनसाठी किती व्याजदर आकारत आहे याविषयी जाणून घेणार आहोत.
तसेच जर पंजाब नॅशनल बँकेकडून 30 लाख रुपयांचे होम लोन घेतले तर किती रुपये अधिक व्याज द्यावे लागेल याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पंजाब नॅशनल बँकेचे होम लोनचे व्याजदर
पंजाब नॅशनल बँक ही देशातील एक प्रमुख पीएसबी आहे. भारतात एकूण 12 पीएसबी म्हणजेच पब्लिक सेक्टर बँक आहेत. या बारा पब्लिक सेक्टर म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत पंजाब नॅशनल बँकेचा देखील समावेश होतो.
या बँकेकडून आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर 9.40 टक्क्यांपासून सुरू होतात.
ग्राहकांना सिबिल स्कोरच्या आधारावर गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ज्याचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांना कमी व्याज दरात गृह कर्ज मिळू शकते. जर तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला 9.40% व्याजदरात गृह कर्ज मिळू शकते.
30 लाखाचे होम लोन घेतले तर कितीचा हफ्ता भरावा लागणार ?
पंजाब नॅशनल बँकेकडून जर 30 लाख रुपयांचे होम लोन घेतले आणि 20 वर्षांची परतफेड ठेवली तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो ? आम्ही आपणास सांगू इच्छितो की, या बँकेकडून जर ग्राहकांना 9.40% व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध झाले तर 30 लाख रुपयांच्या आणि वीस वर्षांच्या परतफेडीच्या कर्जासाठी कर्जदाराला 27 हजार 768 रुपये EMI भरावा लागेल.
म्हणजेच या कालावधीत 36.64 लाख रुपये व्याज सदर कर्जदाराला भरावे लागणार आहे. म्हणजेच या कालावधीत 30 लाख रुपयांची मूळ रक्कम आणि 36.64 लाख रुपयांचे व्याज असे 66.64 लाख रुपये कर्जदार व्यक्तीला फेडावे लागणार आहेत.